नांदेडमध्ये राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? कार्यकारिणी निवडीवरून पक्षातील बडा नेता नाराज; चिखलीकरांना उघडपणे सुनावले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नांदेड शहर आणि नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षांसह खांदेपालट करण्यात आले. प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. पण यावर भास्करराव पाटील खतगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नांदेड शहर आणि नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षांसह खांदेपालट करण्यात आले. रविवारी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यकारिणीची घोषणा करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नांदेड दक्षिणच्या निवडीवरून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासमोरच उघडपणे नाराजी व्यक्त केली. तुमच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत, पण आम्हाला सासूबाई म्हणून विचारत जा. तुरीचं मुगाच किंवा पिठलं खाऊ घाला, असं म्हणत खतगावकर यांनी चिखलीकरांना टोमणा मारला. दरम्यान निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा धडाका सुरु आहे. अनेकजण जण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. पक्षात प्रवेश करणाऱ्यांना आज नवीन जवाबदाऱ्या देण्यात आल्या.

पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट करून नवीन कार्यकारिणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केली. यात शहर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश उपाध्यक्षपदी मीनल खतगावकर, शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी माधव पावडे तर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. पत्रकार परिषदेदरम्यान माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या नियुक्तीवरून आमदार चिखलीकरावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. आपल्याला विश्वासात न घेता ही निवड जाहीर करण्यात आल्याचे खतगावकर म्हणाले.आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज सकाळपासून माझ्यासोबत होते आणि एकत्र नाष्टा केला. तरी, नांदेड दक्षिणच्या नियुक्तीबाबत आमचे ठरले नव्हते, असे असतानाही चिखलीकरांनी आम्हाला न सांगता नांदेड दक्षिणची नियुक्ती जाहीर केली आहे.

पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करा पण, सासूबाई म्हणून आम्हाला एकदा तरी विचारा. याबाबत आपण वरिष्ठांशी बोलणार असल्याचे खतगावकर यांनी सांगितले.नाराजी व्यक्त करत खतगावकर म्हणाले, आम्हाला तुमच्या नेतृत्वात काम करायचं आहे. काय करायचं आहे ते करा, पण सासूबाई म्हणून आम्हाला पण विचारत जा. तुरीचं, मुगाचं किंवा पिठलं खाऊ घाला, पण आम्हाला पण थोडं स्वातंत्र्य लागेल, अस म्हणत आपली पाठ दुखत असल्याचे कारण देत, खतगावकर हे अर्ध्यातच पत्रकार परिषद सोडून निघून गेले. दरम्यान भास्करराव पाटील खतगावकर यांनी थेट पक्षातील आमदारावर नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.दरम्यान माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नाराजीनंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्टीकरण दिले. सगळ्यांना विश्वासात घेऊनच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. एखाद्याची नाराजी असू शकते, जिल्ह्याच नेतृत्व करत असताना सगळ्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे अस माझं मत असल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले. खतगावकर हे जेष्ठ नेते आहेत, सगळ्याच गोष्टी सर्वांच्या मनासारखे होतं नाहीत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने नियुक्त असल्याचे चिखलीकर म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.