खंडाळा घाटात भीषण अपघात; ट्रकमधील पाइप वाहनांवर पडून दोघींचा मृत्यू, पाच गंभीर जखमी.

ट्रकचा अचानक ब्रेक लागल्याने ट्रकमधील पाइप धक्क्याने मागे घसरून ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी आणि कारवर पडले अन् भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटातील (खंडाळा) चढावर पाइप वाहून नेणाऱ्या ट्रकचा अचानक ब्रेक लागल्याने ट्रकमधील पाइप धक्क्याने मागे घसरून ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी आणि कारवर पडले अन् भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास खंडाळा घाटातील मॅजिक पॉइंट येथे घडला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.ऋतुजा चव्हाण (२६, रा. वारजे), अंकिता शिंदे (२८, रा. नेरे, मुळशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

वैभव गलांडे (२९), सोनाली खडेत्रे (३३), शिवराज खडेत्रे (६), लता शिंदे (५०, सर्व रा. वारजे), ललित शिंदे (३०, नेरे, मुळशी) अशी जखमींची नावे आहेत.खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीहून खंडाळा (बोर) घाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने घाट चढत असताना अचानक ब्रेक मारला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी पाइप ट्रकमधून निसटले आणि ते मागून येत असलेल्या कार आणि दुचाकीवर पडले. या अपघातात दुचाकीवरील ऋतुजा चव्हाण यांचा मृत्यू झाला; तर मागे बसलेले वैभव गलांडे जखमी झाले. कारमध्ये बसलेल्या अंकिता शिंदे यांनाही जीव गमवावा लागला; तर कारमधील सोनाली, शिवराज, लता आणि ललित हे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहायक पोलिस निरीक्षक ठाकरे व हवालदार अमोल धायगुडे यांनी सहकाऱ्यांसह;

तसेच देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबी पेट्रोलिंग, ‘डेल्टा फोर्स’चे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करून अपघातात पाइपखाली अडकलेल्या महिलांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जखमींना उपचारासाठी तत्काळ खोपोली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळित झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल धायगुडे करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.