कन्नडच्या माजी सरपंचाला भरदिवसा निर्घृणपणे संपवलं; तिघांना अटक, धक्कादायक कारण समोर.

माजी सरपंच राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे १२ जुलै रोजी शेतातील त्यांच्या घरासमोरील खडीवर मोबाइल बघत बसले होते. एका दुचाकीवर तीन जण आले. त्यांनी चुंगडे यांच्यावर वार करून खून करून मारेकरी पळून गेले.भरदिवसा गावाच्या माजी सरपंचवर कोयत्याने वार करून त्याची निघृण हत्या केल्याची घटना कन्नड ग्रामीण भागातील मौजे शिरसगाव येथे घडली. मृत माजी सरपंचाचे नाव राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे (वय ४७) असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तिघांनी हा खून गावातील वादातून केल्याची कबुली दिली.मारेकऱ्यापैकी एकाने पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटविण्यासाठी महिलेची वेशभूषा घालून चुंगडे यांचा खून केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. खून करणाऱ्यांचे नावे आनंद अमर राजपूत (वय २५), समीर समद कुरेशी (वय २०) आणि इरफान शकील शहा (वय २०, तिघेही रा. सिरसगाव, ता. कन्नड) असे आहे.

कन्नड तालुक्यातील सिरसगाव येथे माजी सरपंच यांच्या खुनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, विजयकुमार ठाकूरवाड, विजयसिंह राजपूत यांची उपस्थिती होती. डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले, ‘माजी सरपंच राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे १२ जुलै रोजी शेतातील त्यांच्या घरासमोरील खडीवर मोबाइल बघत बसले होते. एका दुचाकीवर तीन जण आले. त्यांनी चुंगडे यांच्यावर वार करून खून करून मारेकरी पळून गेले.’डॉ. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार चुंगडे यांचा खून करण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. आनंद राजपूत याला चुंगडेने एक ते दीड वर्षापूर्वी मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी राजपूतने कट रचला. समीर कुरेशीवर कन्नड ग्रामीणमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. त्यात चुंगडेने मदत केली नव्हती. इरफान शहा आणि चुंगडे याच्यात कब्रस्तानाच्या जागेवरून वाद होता. या वादातून तिघांनी चुंगडे याची हत्या केली. गुन्हे शाखेने संशयित आनंद अमर राजपूतला शिरसगावातून ताब्यात घेतले.

त्याने दिलेल्या माहितीवरून, खुनातील साथीदार समीर कुरेशी आणि इरफान शहा या दोघांना श्रीरामपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने घटना दाखल होण्याच्या २४ तासांच्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत, संतोष मिसळे, पवन इंगळे, सुधीर मोटे, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, अशोक वाघ, महेश बिरूटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, रामचंद्र पवार, पोलिस उपनिरीक्षक जाधव, व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.गावात सीसीटीव्हीची व्यवस्था नसल्याने आरोपींचा शोध अवघड होता. पोलिसांना काही प्रत्यक्षदर्शींनी मोटारसायकलवरून काही जण जात असताना पाहिल्याचे सांगितले. त्यातील एक जण गावात होता. संशयित व्यक्ती पळून जाऊ नये यासाठी पत्ता विचारल्याच्या बहाण्याने पोलिसांनी आनंद राजपूतला जवळ बोलावून पकडले. पोलिस चौकशीत आनंद राजपूतने हा खून समीर कुरेशी आणि इरफान शहा याच्यासोबत केल्याची कबुली दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.