लक्ष्मी केवटे हॉटेलमध्ये काम करतात. त्यांना भेटण्यासाठी मुलगा सचिन केवटे हॉटेलमध्ये आला होता. आईला भेटून सचिन बाईकने निघाला.बार्शी तालुक्यातील जामगावजवळ एका हॉटेलमध्ये आईला भेटून परत जात असताना भरधाव पिकअप आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 12 जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बार्शी-लातूर रोडवर एका हॉटेलजवळ घडली. सचिन नाना केवटे (रा. राऊत चाळ, बार्शी), असे मयत तरुणाचे नाव आहे.
जयराम श्रीराम ननवरे (रा. बोरगाव खुर्द, ता. बार्शी) गुन्हा दाखल झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. याबाबत अक्षय चंद्रकांत चोपडे यांनी फिर्याद दिली असून बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.लक्ष्मी केवटे हॉटेलमध्ये काम करतात. त्यांना भेटण्यासाठी मुलगा सचिन केवटे हॉटेलमध्ये आला होता. आईला भेटून सचिन आपल्या मोटारसायकल (एमएच 13 ईयू 7893) वरून बार्शीकडे जात होता. याचवेळी बार्शीकडून येणाऱ्या भरधाव पिकअप (एमएच 13 सीयू 8623) ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे सचिन रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाला.सचिन केवटे हा अपघातानंतर जबर जखमी होऊन रस्त्यावर पडला होता. अपघाताची माहिती मिळताच अक्षय चोपडे, प्रशांत रणझुंणजारे व किरण काकडे आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सचिनला रस्त्याच्या बाजूला घेत उपचारासाठी तत्काळ रिक्षाने बार्शी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर सचिनचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत बार्शी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रूपेश शेलार हे करीत आहेत.









