भडगाव शहरातील जिल्हा परिषद शाळा नं. २ ची दयनीय अवस्था — प्रशासनाचा ठसा नाहीच!

भडगाव : शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, भडगाव पेठ येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवन धोक्यात आले असून, शाळेची अवस्था पाहता ती पूर्णतः दुर्लक्षित झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.या शाळेत खेळण्यासाठी कोणतेही मैदान उपलब्ध नसून, संपूर्ण आवारात गवत व झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून, कोणतीही साफसफाई गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आलेली नाही. शौचालये पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत असून, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्वयंपाक घरात पावसाळ्यात पाणी साचते, त्यामुळे शालेय पोषण आहाराचीही व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शाळेच्या इमारतीच्या भिंती झिजून शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्या असून, दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच, भडगाव शहरातील या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय असून, प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. जिल्हा परिषद, ना नगर परिषद याकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पालक व नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शाळेची दुरुस्ती, स्वच्छता आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी पेठ भागातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.