कात्रज कोंढव्यासह येवलेवाडीत डोंगरफोड, महसूलमंत्री बावनकुळेंची विधानसभेत कबुली.

‘पुणे शहर व जिल्ह्यातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडीसह पानशेत रस्ता येथे अनधिकृत प्लॉटिंग होत असून, त्याबरोबरच डोंगरफोडही करण्यात येत आहे,’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत कबुली दिली. डोंगरफोडीमुळे भूगर्भ जलस्तर, जैवविविधता, परिसरातील हवामान आणि लोकजीवनावर झालेल्या परिणामाचा अहवाल तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.पुण्यातील भाजप आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार बापूसाहेब पठारे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील बेकायदा डोंगरफोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

त्या वेळी बावनकुळे यांनी डोंगरफोड होत असल्याबाबत कबुली दिली.जिल्ह्यात खडकवासला, पानशेत रस्ता आणि परिसरातील अन्य भागांत अनधिकृत डोंगरफोड सुरू आहे. कोणत्याही परवानगीशिवाय खनिज उत्खनन, झाडांची तोड होत असून, राडारोडा टाकण्यात आल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले.अवैध गौण खनिज उत्खननाबाबत हवेलीच्या तहसीलदारांनी नऊ प्रकरणांमध्ये १६ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दंडाचा आदेश दिला आहे. त्या रकमेच्या वसुलीची कार्यवाही सुरू आहे. महापालिकेच्या आरक्षित जागेवर आणि डोंगरा माथा-डोंगर उताराच्या ठिकाणी अनधिकृत प्लॉटिंग करून बांधकामे, गोदामे, रस्ते करण्यात आले आहेत. त्यानुसार, महापालिकेने अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार कोंढवा पोलिस स्थानकात गुन्हे दाखल केले असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.‘शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथे अनधिकृत प्लॉटिंग झाले असून, त्या अनुषंगाने महसूल विभागाची बैठक झाली होती. त्यात अनधिकृत उत्खननबाबत कायद्यातील तरतुदी तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी सूचना हवेलीच्या तहसीलदारांना करण्यात आली; तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात पुणे महापालिकेने तातडीने कारवाई करण्यासंदर्भातही आयुक्तांना सांगण्यात आले आहे,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.‘शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथे अनधिकृत प्लॉटिंग झाले असून, त्या अनुषंगाने महसूल विभागाची बैठक झाली होती. त्यात अनधिकृत उत्खननबाबत कायद्यातील तरतुदी तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी सूचना हवेलीच्या तहसीलदारांना करण्यात आली; तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात पुणे महापालिकेने तातडीने कारवाई करण्यासंदर्भातही आयुक्तांना सांगण्यात आले आहे,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.