रील्स, अकादमी की टोमणे? टेनिसपटू राधिकाची हत्या नेमकी कशामुळे? वडिलांमुळे सस्पेस्न वाढला.

गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात वडील दीपक यादव यांना अटक करण्यात आली आहे. राधिकाची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तिच्या हत्येमागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण दीपक यादव चौकशीत सहकार्य करत नसून वारंवार जबाब बदलत आहेगुरुग्राम: हरियाणाच्या गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्याकांड प्रकरणात तिच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. दीपक यादव यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसानी यादव यांना गुरुवारी घटनास्थळावरुन अटक केली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

दीपक यादव यांनी त्यांची लेक राधिकाची हत्या केली, यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राधिकाची हत्या रील्समुळे झाली की टेनिस अकादमीमुळे याचं गूढ कायम आहे. राधिकाच्या वडिलांनी तिचा जीव रील्स किंवा व्हिडीओमुळे घेतला, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. तो व्हिडीओ बराच जुना आहे. राधिकाच्या कुटुंबियांनी त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, राधिका टेनिस अकादमी चालवत असल्यानं तिचे वडील नाराज होते. वडिलांनी राधिकाला अनेकदा टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितलं. पण राधिकानं त्यांचं ऐकलं नाही. दीपक यांनी राधिकावर ४ गोळ्या झाडल्या. हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, राधिका टेनिस अकादमी चालवत असल्यानं तिचे वडील नाराज होते. वडिलांनी राधिकाला अनेकदा टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितलं. पण राधिकानं त्यांचं ऐकलं नाही. दीपक यांनी राधिकावर ४ गोळ्या झाडल्या. हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे.हत्याकांडात वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची काडतुसं पोलिसांना जप्त करायची आहेत. दीपक यादव यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना होता. त्यांच्या घरातून डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर जाताना एक सीसीटीव्ही आहे. आरोपी दीपकच्या समोरच सीसीटीव्ही डीव्हीआर तपासला जाईल.दीपक यादव पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. तो सतत आपला जबाब सतत बदलत आहे. त्यामुळे हत्येमागील खऱ्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत. दीपक सातत्यानं जबाब बदलत असल्यानं राधिकाच्या हत्येमागील गूढ वाढलं आहे. राधिकाचं सोशल मिडिया प्रोफाईल गायब आहे. त्याचा तपास गुरुग्राम पोलिसांना करायचा आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.