राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांचे महसुल मंत्र्यांना निवेदन.

खामगाव, (का. प्र.): अतिक्रमण हटाव मोहिम दरम्यान रस्ता कामात अडथळा नसणाऱ्या पक्के बांधकाम पाडल्याप्रकरणी खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे या बांधकामाचा खर्च श्री शेळके यांच्या पगारातून वसुल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी महसुल मंत्री कडे केली आहे. याबाबत सविस्तर असे की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, १९९५ च्या महायुतीच्या काळात महाराष्ट्र शासनाने झुणका भाकर योजना सुरू केली होती, त्या काळात खामगाव नगरपालिके हद्दीत ही झुणका भाकर केंद्र योजना लागू करण्यात आली होती. खामगावात भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना झुणका भाकर केंद्रासाठी जागा देण्यात आल्या होत्या.

त्या जागेवर पक्के बांधकाम करुन झुणका भाकर केंद्राची स्थापना करण्यात आली होती. नगरपालिका हद्दीत खामगाव बस स्टैंड समोर, नगरपालिका परिषद समोर, तहसील कार्यासमोर, अशी या प्रकारचे अनेक ठिकाणी झुणका भाकर केंद्र शासनाच्या शासकीय जागेवर बांधण्यात आले होते . सदर झुणका भाकर केंद्र कुठलेही रहदारी अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून त्यावेळेस बांधण्यात आले होते. सदरचे बांधकाम दिनांक २८ जुन २०२५ पर्यंत सुस्थितीत होते. दिनांक २८ जुन रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी अवैधरित्या कुणालाही नोटीस न देता जेसीबी मशीनच्या सहाय्याने सदर झुणका भाकर केंद्राची पक्की इमारत नेस्तनाबूत केली. अंदाजे प्रत्येकी तीन लाख असे एकूण तीन झुणका भाकर केंद्राचे नऊ लाख रुपयांचे त्यांनी नुकसान केले आहे. यामध्ये शासनाचे पैशाने बांधलेल्या झुणका भाकर केंद्राचे अतोनात नुकसान झालेले आहे. संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचे पदाचा दुरुपयोग करून राजकीय दबावा खाली येऊन शासकीय मालमत्तेचे फार मोठे नुकसान केले आहे, झुणका भाकर योजना बंद पडल्यामुळे तसेच अनुदान बंद पडल्यामुळे सदरचे केंद्रातून बेरोजगार युवक चाय व नाश्ता विकून आपले व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होते. त्या जागेचा आज पर्यंतचा कर भरत होते. असे असताना मुख्याधिकारींनी हिटलरशाही पद्धतीने त्या कुटुंबावर सुद्धा उपासमारीची पाळी आणलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रथमदर्शनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी दिसतात, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्याधिकारी खामगाव यांच्यावर कडक कारवाई करून शासनाच्या झालेल्या मालमत्तेची नुकसान भरपाई त्यांच्या पगारातून करून घ्यावी व लघु व्यवसायिकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.