तुम्ही फ्यूल का बंद केलंत? एअर इंडिया विमान अपघाताआधी अखेरचा संवाद; कॉकपिटमध्ये काय घडलं?

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. टेकऑफनंतर काही क्षणातच विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्याने वेग कमी होऊन ते कोसळले.अहमदाबाद: एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. भारतीय विमान दुर्घटना तपास अन्वेषण विभागाच्या (एएआयबी) १५ पानी अहवालातून बरीच धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. टेकऑफच्या काही सेकंदानंतर विमानाची दोन्ही इंजिन अचानक बंद झाली. त्यामुळे विमानाचा वेग कमी झाला आणि ते कोसळलं.

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला १२ जूनला अपघात झाला. बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमान टेकऑफनंतर अवघ्या एका मिनिटात कोसळलं. या मिनिटभराच्या कालावधीत दोन्ही पायलट्समध्ये झालेला संवाद कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये (सीव्हीआर) कैद झाला आहे. तुम्ही फ्यूल का बंद केलंत, असा प्रश्न एक पायलट विचारतो. त्यावर दुसरा पायलट मी काहीही केलेलं नाही, असं उत्तर देतो. या संवादानंतर काही सेकंदांमध्ये विमानाचा वेग मंदावतो आणि ते विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळतं.भारतीय विमान दुर्घटना तपास अन्वेषण विभागानं (एएआयबी) प्राथमिक अहवाल जारी केलेला आहे. तो १५ पानांचा आहे. तांत्रिक कारणं आणि कॉकपिटमध्ये झालेल्या शेवटच्या संवादाचा उल्लेख अहवालात आहे. दोन पायलट्समधील अखेरच्या संवादामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाला १२ जूनला अपघात झाला. हे विमान टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये कोसळलं. विमानाची दोन्ही इंजिन बंद झाल्यानं अपघात झाला.उड्डाणानंतर दोन्ही इंजिनचे फ्यूल कटऑफ स्विच रनहून कटऑफ मोडवर गेले. अवघ्या एका सेकंदाच्या दरम्यान हा प्रकार घडला. यानंतर दोन्ही इंजिनांची थ्रस्ट क्षमता पूर्णपणे संपली. विमान उड्डाणानंतर एका मर्यादित उंचीपर्यंत पोहोचलं. त्यानंतर ते हळूहळू खाली येत गेलं आणि मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं. विमानात २४२ जण होते. पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान कोसळलेल्या भागात १९ अन्य नागरिक मरण पावले.अपघाताच्या काही सेकंद आधी दोन्ही पायलट्समध्ये झालेला संवाद रेकॉर्ड झालेला आहे. त्यात एक पायलट ‘तु्म्ही फ्यूल का बंद केलं?’ असा प्रश्न विचारत असल्याचं ऐकू आलेलं आहे. त्यावर दुसरा पायलट मी तसं काहीही केलेलं नाही, असं उत्तर देतो. तांत्रिक बिघाड किंवा मानवीय भ्रमामुळे अपघात झाला असावा, असे संकेत यातून मिळतात. टेकऑफनंतर काही सेकंदांमध्ये विमानातील इमर्जन्सी पॉवर सप्लाय सिस्टिम (आरएटी) सक्रिय झाली होती. ही सिस्टिम इंजिन बंद झाल्यावर सुरु होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.