जळगाव शहरातील रॉयल पॅलेस हॉटेलमध्ये पोलिसांनी धाड टाकून मोठा जुगार अड्डा उघडकीस आणला. हॉटेलच्या एका रूममधून सुमारे 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून आठ जुगार्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.vजळगाव शहरातील उच्चस्तरीय हॉटेल म्हणून ओळख असलेली हॉटेल रॉयल पॅलेस येथे मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी हॉटेलच्या 2009 नंबरच्या रूममधून 20 लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील असे अनेक उच्चस्तरीय हॉटेल आहेत की त्यामध्ये पत्त्यांचा खेळ खेळला जातो. रेल्वे स्थानकाला लागत देखील अशीच एक मोठी हॉटेल आहे. त्यामध्ये देखील रूम बुक करून पत्त्यांचा खेळ खेळला जातो हे जळगाव शहरातील नागरिकांना माहिती आहे. मात्र पोलिसांना काल याबाबत माहिती मिळाली.
जिल्ह्यात वाढत्या जुगाराला आळा घालण्यासा पोलीस प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी आणि अपरपोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अथिकारी संदीप गावीत यांच्यालेखी आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने हॉटेल रॉयल पँलेस येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत 19 लाख 97 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि 13 मोबाईल हँड्सेटसह 8 जुगारींना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुरूवारी 10 जुलैला मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदाना जवळील रूम नंबर 209 मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी टीम तयार करू हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये छापा टाकला.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुरूवारी 10 जुलैला मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदाना जवळील रूम नंबर 209 मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी टीम तयार करू हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये छापा टाकला.जळगाव शहरातील अनेक असे उच्चस्तरीय हॉटेल आहे. त्या ठिकाणी रूम बुक करून दिवस-रात्र पत्त्यांचा खेळ खेळला जातो. अशाचप्रकारे एक रेल्वे स्टेशन स्थानकालगत देखील मोठी नावाजलेले हॉटेल आहे. या ठिकाणी अशाच पद्धतीने रूम बुक करून दिवस-रात्र पत्त्यांचा खेळ खेळला जातो. हे अनेक दिवसांपासून सुरू आहे. जळगाव शहरातील नागरिकांना देखील याची कल्पना आहे. मात्र पोलिसांना याची खबर काल लागली असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.









