“मला जाण्याचे दुःख आहे पण… लव्ह यू ऑल” स्वतःला एकटं पाडलं अन् स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने नको तेच केलं.

थोडं थांबा! प्रत्येकवेळी आपण स्वतःला कमी समजून नैराश्यात न जाता आतापर्यंत जे जे Achievements मिळवले आहेत ते आठवून स्वतःत उमेद निर्माण करणं महत्त्वाचं ठरतं. कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा ‘मागे वळून’ पाहणं खूप महत्त्वाचं. आणि या सगळ्या तणावात तज्ञांचं मत घेणं कधीही उपयुक्त ठरतं.या जगात सर्वात दुर्मिळ होत चाललेली गोष्ट म्हणजे सुखाची झोप. प्रत्येकचजण आज फक्त कशा ना कशाच्या मागे धावतच आहे. आणि या धावपळीत माणूस स्वतःला हरवत चाललाय. सतत जबाबदारीच्या ओझ्याखाली दबत चालल्यामुळे ‘मोकळा श्वास’ घेणं कठीण होत चाललंय.

इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता माणूस अधिक तणावग्रस्त होत चाललाय. ज्याने जगणं हरवत चाललंय. ज्या स्पर्धेत आपण उतरलोय त्यात आपण जिंकलच पाहिजे असा अट्टहास नैराश्याला जन्म देतो. इच्छित आणि अपेक्षित गोष्ट नाही मिळाली की प्रचंड मानसिक तणाव निर्माण होतो. आणि तरुण पिढी याची सर्वात जास्त बळी ठरतेय.पण थोडं थांबा! प्रत्येकवेळी आपण स्वतःला कमी समजून नैराश्यात न जाता आतापर्यंत जे जे Achievements मिळवले आहेत ते आठवून स्वतःत उमेद निर्माण करणं महत्त्वाचं ठरतं. कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा ‘मागे वळून’ पाहणं खूप महत्त्वाचं. आणि या सगळ्या तणावात तज्ञांचं मत घेणं कधीही उपयुक्त ठरतं.राजस्थानमधील डीडवाना-कुचामन आणि चूरू जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. एका 26 वर्षीय तरुणाने मानसिक तणावामुळे ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. हेतराम मेघवाल असे या तरुणाचे नाव आहे. तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. नोकरी न मिळाल्याने आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे तो तणावात होता. त्याने सुसाइड नोटमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.हेतराम मेघवाल चूरू जिल्ह्यातील सुजानगडचा रहिवासी होता. लाडनूंजवळ खानपूर फाटक येथे ही घटना घडली. त्याने मेड़ता-रतनगढ़ डेमू ट्रेनसमोर आत्महत्या केली. त्याच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली. त्यात त्याने लिहिले, “मम्मी-पापा मला माफ करा, मला आता या जगात राहायचे नाही. काही कारण नाही, फक्त मी स्वतःला कंटाळलो आहे… श्रीदेवी (बदललेले नाव) चे लग्न दुसरीकडे करून द्या”. त्याने पुढे लिहिले, “2000 रुपये देवकी भाईला द्या, 1000 मनीष महरियाला आणि मोबाईल श्रीनाथला द्या. मला जाण्याचे दुःख आहे पण आता डिप्रेशन खूप वाढले आहे. आता कोणताही मार्ग नाही. सगळे खुश राहा. लव्ह यू ऑल.”हेतरामचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला 2 महिन्यांची मुलगी आहे. तो BSC झाल्यानंतर बँकिंग आणि सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत होता. त्याचे मोठे भाऊ देवकीनंदन यांनी सांगितले की, तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. RPF चे एएसआय रविंद्र सिंह यांनी सांगितले की, ट्रेन चालकाने त्यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लाडनूं रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.