शिरसाटांचा गेम करण्याचा डाव? बेडरूममधील व्हायरल व्हिडीओवर बोलताना ‘मातोश्री’चं नाव घेत म्हणाले…

मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेल प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यातच, त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. संपत्तीत मोठी तफावत आढळल्याने हे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिरसाटांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे.मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेल प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यातच, त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. संपत्तीत मोठी तफावत आढळल्याने हे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिरसाटांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे.संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिरसाट हे बेडरूममध्ये बसलेले दिसत असून तिथे पैशांनी भरलेली बॅग आहे. ते बेडवर बनियानवर बसून फोनवर बोलत आहेत. यावेळी बॅगच्या शेजारी एक कुत्रा बसलेला दिसत आहे. शिरसाटांनी स्पष्ट सांगितले की, हा व्हिडीओ माझ्या बेडरूममधील आहे. मी कुठूनतरी प्रवासातून आलोय आणि बेडवर बसलो आहे. माझ्या बाजूला ज्या बॅग आहेत, त्या कपड्यांचा असून प्रवासातून आल्याने त्या तशा पडलेल्या आहेत.व्हायरल व्हिडीओनंतर संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. Sanjay Shirsat नी म्हटले की, संजय राऊतांनी आजही भुंकण्याचे काम केले आहे. सकाळी उठले की, एकनाथ शिंदे, दुपारी एकनाथ शिंदे, मेळावा असले की, एकनाथ शिंदे. संजय राऊतांनी त्यांच्या मनातील मळमळ आज बाहेर काढलीये. मला वाटते की, त्यांची हातपाय बांधून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की, काय? अशी परिस्थिती निर्माण झालीये. मला वाटते की, अशा मुर्ख माणसासाठी तुम्हीही वेळ घालू नये.पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटले, यांचे काम बडबडने आहे. व्हिडीओमध्ये जे घर आहे ते माझं आहे आणि मी माझ्या बेडरूममध्ये बसलोय. बाजूला माझा लाडका कुत्रा तिथे आहे आणि अजून एक बॅग तिथे आहे. याचा अर्थ असा होतो की, मी कुठल्यातरी प्रवासातून आलोय आणि माझ्या बेडवर बसलोय. अरे मुर्खांनो जर एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असेल तर आलमाऱ्या मेल्या आहेत का? त्या बॅगमध्ये नोटा आहेत तर आलमाऱ्यांमध्ये ठेवला असत्या ना…यांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही.पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटले, यांचे काम बडबडने आहे. व्हिडीओमध्ये जे घर आहे ते माझं आहे आणि मी माझ्या बेडरूममध्ये बसलोय. बाजूला माझा लाडका कुत्रा तिथे आहे आणि अजून एक बॅग तिथे आहे. याचा अर्थ असा होतो की, मी कुठल्यातरी प्रवासातून आलोय आणि माझ्या बेडवर बसलोय. अरे मुर्खांनो जर एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असेल तर आलमाऱ्या मेल्या आहेत का? त्या बॅगमध्ये नोटा आहेत तर आलमाऱ्यांमध्ये ठेवला असत्या ना…यांना पैशांशिवाय काहीच दिसत नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.