सोलर लावल्यानंतरही दुप्पट वीजबिल; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रारींचा पाऊस..

सोलर लावल्यानंतरही दुप्पट वीजबिल; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रारींचा पाऊस..

जळगाव, दि. ११ जुलै: वाढत्या वीजबिलावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी लाखो रुपये खर्चून सोलर सिस्टीम बसवल्या. मात्र, अशा सोलर वापरकर्त्यांना नेहमीपेक्षा जास्त, काही वेळा दुप्पट वीजबिल आकारले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त होत आहेत.या संदर्भात गंभीर दखल घेत मनसेच्या वतीने नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्यांना सोलर यंत्रणा बसवूनही जास्त वीजबिल आले आहे, अशा सर्व वीज ग्राहकांनी आपले तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष
ॲड. जमील देशपांडे यांनी केले आहे.तक्रार नोंदवण्यासाठी इच्छुक नागरिकांनी,लाईट बिलाची झेरॉक्स, सोलर लावण्याची तारीख,व सोलर पुरवठादार कंपनीची माहिती या सह दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या गणपती नगर येथील कार्यालयात संपर्क साधावा.

या तक्रारींचे संकलन करून वीज वितरण कंपनीला थेट जाब विचारला जाईल. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी तांत्रिक तपासणीसह, नियामक यंत्रणांपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याची भूमिका मनसेने घेतली आहे.”सोलरच्या नावाखाली वीजबिल फुगवत असेल, तर ती सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे. हे सहन केले जाणार नाही,” असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी दिला आहे.ॲड. जमील देशपांडेजिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव.११ जुलै २०२५

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.