भरधाव कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये, दुचाकीला धडक; कारचा चक्काचूर, दोघांचा दुर्दैवी शेवट.

शिर्सुफळ फाट्याजवळ भीषण अपघात झाला, यात दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर खराडेवाडी नजीक शिर्सुफळ फाट्यावर १० जुलै रोजी रात्री साडेदहा दरम्यान अपघाताची भीषण घटना घडली. या घटनेत विशाल रामचंद्र कोकरे या दुचाकीस्वाराचा, तर चारचाकी चालक अजित लक्ष्मण लगड याचाही मृत्यू झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टाटा टिगोर कंपनीची कार दौंडकडून बारामतीकडे निघाली होती. कार अत्यंत वेगाने निघाली होती. या कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार राष्ट्रीय महामार्गावरील मोठा दुभाजक ओलांडून डावीकडील बाजूला,

ज्या रस्त्याने बारामतीकडून दौंडला वाहनं जातात, त्या विरुद्ध बाजूला विरुद्ध दिशेने गेली.त्याच वेळी बारामतीकडून कुरकुंभच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी निघालेल्या दुचाकी चालकाला या कारने जोरात धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की, यात वाहनचालकाचं शीर धडापासून वेगळं झालं आणि त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. यात चारचाकी कार चालकाचाही जागीच मृत्यू झाला. अपघातात चारचाकी वाहन (MH42 BE 5866) पलटी झालं. अपघाताच्या जागेपासून जवळपास 300 फूट अंतरावर कार फरपटत जाऊन लोखंडी संरक्षित कठड्यावर आदळली.अपघात इतका भीषण होता, की दुचाकी चारचाकीमध्ये शिरली होती. खराडेवाडीच्या ग्रामस्थ आणि ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी तातडीची मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सोमनाथ होले, पोलीस शिपाई सचिन कोकणे आदींनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले, पंचनामा केल्यावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.याप्रकरणी धुमाळवाडी, पणदरे (ता. बारामती) येथील हर्षद रामचंद्र कोकरे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर मृत कार चालक अजित लक्ष्मण लगड (रा. गोपाळवाडी, दौंड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लगड हा देखील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होता, अशी माहिती आहे. सुपा पोलीस ठाण्याचे फौजदार कोळी पुढील तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.