हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका धक्कादायक घटनेत शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची हत्या केली. जगबीर सिंह पन्नू असे मृत मुख्याध्यापकांचे नाव असून, बेशिस्तीवरुन ओरडल्याने विद्यार्थ्यांनी हे कृत्य केले. एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाची शाळेच्याच आवारात हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनीच मुख्याध्यापकांना चाकूनं भोसकलं. जगबीर सिंह पन्नू असं हत्या झालेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. बेशिस्तीवरुन ते दोन विद्यार्थ्यांना ओरडले होते. मुख्याध्यापक चारचौघात ओरडल्यानं विद्यार्थी नाराज झाले. त्यांनी संधी मिळताच मुख्याध्यापकांवर चाकूनं अनेक वार केले. त्यानंतर ते फरार झाले. जगबीर सिंह यांचं वय ५५ वर्षे होतं. ही घटना हरियाणात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात भीती बसली आहे.
हरियाणाच्या हिसारमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेच्या आवारात मुख्याध्यापकाची हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शाळेचे दोन विद्यार्थी बाहेर पळताना दिसत आहेत. पुट्ठी गावचे रहिवासी असलेल्या पन्नू यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी पन्नू यांना मृत घोषित केलं. आरोपी विद्यार्थी पन्नू यांच्यावर राग धरुन होते. बेशिस्तपणामुळे पन्नू यांनी त्यांना सुनावलं होतं. वाढलेले केस आणि शर्ट इन केलेला नसल्यानं पन्नू यांनी विद्यार्थ्यांची खरडपट्टी काढली होती.आरोपी विद्यार्थ्यांपैकी एक जण अकरावीत, तर दुसरा बारावीत शिकतो. ते बास गावचे रहिवासी आहेत. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्नू यांनी केस कापण्यावरुन आणि गणवेशाच्या स्वच्छतेवरुन विद्यार्थ्यांना सुनावलं होतं.









