विठ्ठल सहकारी कारखान्याला १ कोटीच्या खंडणीची मागणी, दहा लाख घेताना कथित कामगार नेता रंगेहाथ सापडला.

पंढरपुरात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी टाळण्यासाठी कथित कामगार नेता किरण घोडके याने 10 लाख रुपयांची खंडणी घेतली. आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या कारखान्याच्या कामगारांच्या हक्कांसाठी घोडके लढत होता. पोलिसांनी घोडकेला ताब्यात घेतले असून कसून चौकशी करत आहेत.पंढरपुरातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपुरातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका कथित कामगार नेत्याने चक्क 10 लाख रुपये खंडणी घेतली आहे. किरण घोडके असं तथाकथित कामगार नेत्याचं नाव आहे. किरण घोडके याला खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती आहे.आमदार अभिजीत पाटील चेअरमन असणाऱ्या विठ्ठल सहकारी कारखान्याच्या कामगारांच्या लढ्यासाठी किरण घोडके गेले काही दिवस लढत होते. याच दरम्यान आपण कारखान्याची बदनामी करत नाही त्या बदल्यात 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी किरण घोडके याने केली असल्याची माहिती पुढे आली. यानंतर किरण घोडके याने 10 लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

घोडके याची पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर विठ्ठल कारखान्याच्या कामगारांचं आंदोलन सुरू होतं. यामध्ये किरण घोडके वारंवार कामगारांच्या बाजूने लढत होते. अशा स्थितीत किरण घोडके हे कामगारांचे अघोषित नेते ठरले. आणि याच किरण घोडके याला 10 लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी कारखान्यातील निवृत्त कर्मचाऱ्यांनीही आंदोलन केलं होतं. माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या विरोधात कारखान्यातील निवृत्त कर्मचारी आणि व्यापारी आक्रमक झाले होते. त्यांनी पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर उपोषण केलं. अभिजीत पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने 347 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता.आमदार अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारखान्यावर जप्ती आणली जाणार होती.

मात्र ती टाळली गेली. विठ्ठल सहकारी साखर कारखाना माढा तालुक्यात आहे. आमदार अभिजीत पाटील हे या कारखान्याचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी तीन वर्षांपूर्वी हा बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल कारखान्याची 3 गोदामं सील केली होती.त्यानंतर, अभिजीत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. ते फडणवीसांचे जवळचे मानले जातात. यानंतर, विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा विधानसभेसाठी तिकीट मिळवलं आणि अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचा पराभव केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.