वसईत पुलाखाली बाळाचा आवाज, रडण्याच्या दिशेने गेले आणि… कचऱ्यात प्लास्टिकच्या गोणीत आढळलं नवजात अर्भक.

वसईमध्ये एका हृदयद्रावक घटनेत, कळंब परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या गोणीत एका महिन्याचं नवजात बाळ आढळलं. एका नागरिकाला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. बाळावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.वसई परिसरात अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कचऱ्याच्या ढिगार्‍यात एका प्लास्टिकच्या गोणीत एक महिन्याचं नवजात बाळ आढळल्याची घटना वसई परिसरात समोर आली आहे. एका व्यक्तीला गोणीत चिमुकल्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं असता, त्याला गोणीत एक बाळ दिसलं. स्थानिकांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अर्नाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या बाळाला घटनास्थळावरुन महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.वसईतील कळंब परिसरातील जुन्या खाडी पुलाखाली एक व्यक्ती लघुशंका करण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याला एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येत आहे, याबाबत सदर व्यक्तीने आसपास शोध घेतला. त्यावेळी पुलाखालीच एका कचऱ्याच्या ढिगार्‍यात प्लास्टिकची गोणी दिसली. त्या प्लास्टिकच्या गोणीत एक बाळ ठेवलेलं होतं आणि तेच रडत होतं. व्यक्तीला बाळ रडत असल्याचं आढळून आलं आणि त्याने तात्काळ त्याला गोणीतून बाहेर काढलं. गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली आहे.कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बाळ आढळल्यानंतर सदर व्यक्तीने तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेतून तातडीने वसई – विरार महानगरपालिकेच्या बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.कचऱ्याच्या ढिगार्‍यात प्लास्टिकच्या गोणीत आढळलेलं बाळ ही बालिका असून साधारणतः ती एक ते दीड महिन्याची आहे. सध्या तिच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान अशा प्रकारे कचऱ्याच्या ढिगार्‍यात बाळ कोण सोडून गेलं, तिचे आई-वडील कोण आहेत याबाबतचा शोध आणि अधिक तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.