कंटेनरला धडकून कारचा चक्काचूर, मुंबईतील सावंत कुटुंबावर काळाचा घाला, तिघा सख्ख्या भावंडांचा करुण अंत.

मुंढेगाव परिसरातील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमातील दर्शन सोहळा आटोपून मुंबईकडे परतताना हा अपघात झालागुरुपौर्णिमा सोहळ्यावरून परतणाऱ्या कारला कंटेनरने दिलेल्या धडकेत मुंबईतील तीन भावंडांसह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव शिवारात गुरुवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.मुंढेगाव परिसरातील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमातील दर्शन सोहळा आटोपून मुंबईकडे परतताना हा अपघात झाला. मृतांमध्ये मुंबईतील अंधेरी येथील नित्यानंद सावंत (वय ६२), विद्या सावंत (६५), वीणा सावंत (६८) या तीन भावंडांसह चालक दत्ताराम (रा. मुंबई) यांचा समावेश आहे.गुरुपौर्णिमेनिमित्त मुंढेगाव शिवारातील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमात गुरुवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सावंत कुटुंब गुरुवारी सकाळी मुंबईतून इको कारने या सोहळ्यासाठी दाखल झाले होते.

सोहळा आटोपून इको कार (एमएच ०२/ सीव्ही ५२३०) महामार्गावर येताक्षणीच राख घेऊन येणाऱ्या बल्गर कंटेनरने (एमएच १५/ जेडब्लू १०९०) कारला जोरदार धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाला, कंटेनर उलटला. यात कारमधील तिन्ही भावंडांसह चालकाचा जागीचा मृत्यू झाला.तिन्ही सावंत भावंडे अविवाहित होती. नित्यानंद सावंत मुंबई महापालिकेत, विद्या सावंत बृहन्मुंबई टेलिनिगम (एमटीएनएल) मधील निवृत्त कर्मचारी आहेत. अपघातानंतर कंटेनरचालक सुरेंद्र कुमार वर्मा याला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मद्यपान करून तो कंटेनर चालवत होता, असा संशय आहे.

अपघातानंतर नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या मागांवरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने, उलटलेला बल्गर कंटेनर, मदतीसाठी जेसीबी, रुग्णवाहिका, तसेच पोलिस यंत्रणेची वाहने व ग्रामस्थांमुळे महामार्गावरील एकेरी वाहतूक विस्कळीत झाली.दुसरीकडे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खंडाळा घाटात एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरात धडक दिली. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघे गंभीर आहेत. हा अपघात गुरुवारी (१० जुलै ) पहाटे अडीचच्या सुमारास खंडाळा घाटातील कुणे पुलाजवळील उतारावर झाला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.