भडगाव शहरातील मुख्य रस्ते खड्ड्यांनी भरले ; नागरिक त्रस्त – प्रशासनाचे डोळे अद्यापही बंद!

भडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असूनही शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सध्या शहरातील अनेक रस्ते खड्ड्यांनी भरून गेले आहेत.

पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये चिखल व पाणी साचून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असुन शहरातील एस.टी. स्टँडवरून गावाकडे जाणारा तहसील कार्यालय समोरील रस्ता पूर्णतः उखडला असून, या ठिकाणी साचलेल्या चिखलामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या चिखलमुळे रस्त्यावर नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच गिरणा नदीवरील पूल, जो तालुक्याच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असुन तो खड्ड्यांनी पोखरलेला आहे. वाहनचालकांना हा रस्ता वापरताना खड्ड्यांतून वाट काढावी लागत असून, अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. हा रस्ता शहरातील मुख्य बाजारपेठ, हॉस्पिटल, शाळा आणि महाविद्यालयाकडे जाणारे रस्ता असुन त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. विद्यार्थ्यांना, रुग्णवाहिका चालकांना आणि नागरिकांना यामुळे फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी रस्त्यांची दुरवस्था ही नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखी ठरू लागली आहे. शहरातील प्रमुख समस्या असलेले रस्ते, हे प्रशासनाच्या अपयशाचे प्रतीक बनले आहेत. “भडगाव हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असूनही जर अशी अवस्था असेल, तर ग्रामीण भागात काय स्थिती असेल?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.