निखिलचा संशय वाढत गेला, प्रेयसीसकट सहा महिन्यांच्या मुलीचाही जीव घेतला, दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा.

 विश्वासात घेऊन मांडलेली व्यथा, हकीगत नात्यांमधले मोठे मोठे गैरसमज दूर करु शकते. पण गरज असते कुणीतरी स्वतः पुढाकार घेण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीने ते समजून घेण्याची. नात्यात जर सतत तणाव असेल तर गरज असते व्यवस्थित बोलण्याची. पण जर संशय बळावत गेला तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.संशयाचं भूत एकदा मानगुटीवर बसलं कि संपूर्ण आयुष्याचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. पण, एखाद्या व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्तीचा संशय बळावण्यासाठी काही गोष्टीही कारणीभूत असतात. अशावेळी गरज असते ती एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलण्याची. विश्वासात घेऊन मांडलेली व्यथा, हकीगत नात्यांमधले मोठे मोठे गैरसमज दूर करु शकते. पण गरज असते कुणीतरी स्वतः पुढाकार घेण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीने ते समजून घेण्याची. नात्यात जर सतत तणाव असेल गरज असते व्यवस्थित बोलण्याची. पण जर संशय बळावत गेला तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.नवी दिल्लीत एका लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. मजनू का टीला परिसरात झालेल्या या घटनेत सोनम आर्या नावाच्या 22 वर्षीय महिलेचा आणि तिच्या सहा महिन्यांच्या मुलीचा खून करण्यात आला. आरोपी निखिलने ‘जन्माला न आलेल्या’ बाळाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केले, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. North जिल्ह्याचे डीसीपी राजा बांठिया यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी मजनू का टीला परिसरात दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाली.

क्राईम सीनवर 22 वर्षांची सोनम आर्या आणि एका 6 महिन्यांच्या नवजात मुलीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि सोनम 2023 मध्ये हल्द्वानीमध्ये भेटले होते. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि सोनम गर्भवती राहिली. सोनमने एका मुलाला जन्म दिला, परंतु त्यांनी लग्न केले नसल्यामुळे त्यांनी ते मूल उत्तराखंडमध्ये 2 लाख रुपयांना विकले. त्यानंतर ते दोघे दिल्लीत आले आणि वजीराबादमध्ये राहू लागले. काही दिवसांनी निखिलला संशय येऊ लागला की सोनमचे तिच्या मित्र दुर्गेशसोबत संबंध आहेत. निखिलला अनेकवेळा सोनम आणि दुर्गेश यांच्यातील बोलणी आणि चॅट तिच्या फोनमध्ये सापडली. दरम्यानच्या काळात सोनम पुन्हा गर्भवती राहिली. निखिलने तिला मूल जन्माला घालण्याचा, लग्न करण्याचा आणि एकत्र राहण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, सोनमने त्यास नकार दिला आणि गर्भपात केला.सोनमला दुर्गेशनेच गर्भपात करण्यास मदत केली असल्याचा निखिलला संशय आला. घटनेच्या दिवशी निखिल सोनमच्या शोधात दुर्गेशच्या घरी गेला. परंतु ती तीथे त्याला भेटली नाही. आणि तो पुन्हा घरी परतला. त्यानंतर जेव्हा निखिल सोनमशी बोलत होता, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने सर्जिकल ब्लेडने सोनमचा गळा चिरला. निखिल एवढ्यावरच थांबला नाही. त्याने सहा महिन्यांच्या नवजात मुलीचीही गळा चिरून हत्या केली. त्याने सांगितले की त्याला वाटत होते की दुर्गेश सोनमच्या गर्भपातासाठी मृत्यूसाठी जबाबदार आहे.

त्यामुळे त्याने मुलीचा जीव घेतला.”पोलिसांनी आरोपीला उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे अटक केली, तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तपासात असेही समोर आले आहे की, निखिलने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. स्थानिक पोलीस आणि स्पेशल स्टाफ इन्स्पेक्टर रोहित सारस्वत आणि टीमला आरोपीचा शोध घेण्यासाठी उत्तराखंडला पाठवण्यात आले. आरोपी निखिलचे वडील, भाऊ आणि मित्रांची चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारावर निखिलच्या शोधासाठी एक टीम हल्द्वानीला पाठवण्यात आली. टेक्निकल सर्व्हिलान्सच्या माध्यमातून निखिलच्या फोन नंबरची तपासणी केल्यावर तो उत्तराखंडमधील अनेक लोकांच्या संपर्कात असल्याचे समजले.हल्द्वानीमध्ये पोहोचलेल्या टीमने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीची चौकशी केली. निखिल टनकपूरजवळ बनबसा बॉर्डरमार्गे नेपाळला पळून जाण्याचा विचार करत होता. टीमने सापळा रचून निखिलला हल्द्वानी सोडण्यापूर्वीच पकडले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले . पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.