साताऱ्यात धबधब्याजवळ कार थेट 300 फूट दरीत कोसळली, फोटो काढायला उतरले अन्…

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ दुर्घटना घडली. एका पर्यटकाची कार 300 फूट खोल दरीत कोसळली. कराडमधील गोळेश्वरचा साहिल जाधव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याचे मित्र फोटो काढण्यासाठी खाली उतरल्याने ते बचावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन साहिलला रुग्णालयात दाखल केले. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.पाटण तालुक्यातील सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ एक दुःखद घटना घडली. येथे पर्यटकांची कार जवळपास 300 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत साहिल जाधव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. तो गोळेश्वर, कराडचा रहिवासी आहे. इतर चौघे मित्र फोटो काढण्यासाठी खाली उतरल्याने बचावले. कारचे चाक गवतावरून घसरले आणि चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सडावाघापूरचा उलटा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यामुळे तो अधिक सुंदर दिसतो. कराडहून पाच मित्र मिळून हा धबधबा बघायला आले होते. टेबल पॉईंटजवळ त्यांचे काही मित्र फोटो काढायला उतरले. साहिल (वय 20) मात्र गाडीतच थांबला होता.पोलिसांनी सांगितले की, “पाटण-सडावाघापूर मार्गावर गुजरवाडीच्या हद्दीत टेबल पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. गवतामुळे कारचे चाक घसरले आणि साहिलचा गाडीवरील ताबा सुटला.”अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली.

त्यांनी सुरूलच्या किंगमेकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने साहिलला दरीतून बाहेर काढले. त्याला तातडीने कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. “सडावाघापूरचा उलटा धबधबा बघायला रोज खूप पर्यटक येतात. टेबल पॉईंट हे पर्यटकांसाठी खास ठिकाण आहे. पण याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे फोटो काढताना खूप काळजी घ्यायला हवी,” असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी पर्यटकांना सूचना दिली आहे की, “पर्यटनाचा आनंद लुटा, पण स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात येऊ शकतो.”

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.