मनसेच्या मोर्चाने गदारोळ, पोलिस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली, नवे आयुक्त कोण?

मिरा-भाईंदर येथे मनसेने मोर्चा काढल्यानंतर चांगलाच गोंधळ माजला होता. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेने मोर्चा काढल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. यावरुन सरकारवर मोठी टीका करण्यात आली होती.वसई-विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची बुधवारी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरा-भाईंदरमध्ये मंगळवारी मराठीसाठी निघालेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तणाव निर्माण झाला होता. याच कारणास्तव पोलिस आयुक्त पांडे यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे.

पांडे यांनी डिसेंबर २०२२मध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. या पदावर ते अडीच वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. दोन महिन्यांपासून त्यांच्या बदलीच्या चर्चा सुरू होत्या. अखेर बुधवारी अपर पोलिस महासंचालकपदी ( प्रशासन) त्यांची बदली करण्यात आली. पांडे यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलिस महासंचालकपदी कार्यरत असणाऱ्या निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मिरा-भाईंदरमध्ये मंगळवारी मराठीसाठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. त्याला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. यामुळे मधुकर पांडे यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. परंतु, बदलीच्या आदेशात कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.
मिरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मराठी बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका मराठीजनांकडून घेण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून मोर्चाचे विविध ठिकाणी लावण्यात आलेले फलक उतरवण्यात आले होते. मोर्चाच्या आदल्या दिवशी अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. यासह मोर्चाच्या दिवशी मोर्चास्थळी येणाऱ्या शेकडो मराठी बांधवांची धरपकड केली जात होती. त्यामुळे मोर्चात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. या वेळी जनसमुदाय आक्रमक झाल्याने पोलिसांनी एक पाऊल मागे घेतल्याने नियोजित मोर्चा पार पडला. या मोर्चाला परवानगी नसल्याने मोर्चानंतर गुन्हे दाखल करण्यासारखी कठोर कारवाई केली जाते का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र, कठोर कारवाईबाबत सध्या कोणताही निर्णय झाला नसल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.