1992 ते 1994 या कालावधीत चंद्रपूरच्या राजुरा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नक्षलवादी कारवायांत अंकुश शिंदे यांनी विशेष कामगिरी केली होतीनाशिकचे तत्कालीन पोलिस आयुक्त आणि सध्या राज्याच्या विशेष सुरक्षा विभागाचे (व्हीआयपी सुरक्षा) विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदे (आयपीएस) यांनी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना स्वेच्छानिवृत्तीसाठी गृह विभागाकडे अर्ज सादर केला आहे. नियमित सेवानिवृत्तीला अवघे चार महिने शिल्लक असताना त्यांच्या या निर्णयामुळे पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे.
1992 ते 1994 या कालावधीत चंद्रपूरच्या राजुरा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नक्षलवादी कारवायांत अंकुश शिंदे यांनी विशेष कामगिरी केली होती. 2003 मध्ये भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) त्यांना पदोन्नती मिळाली. 11 जून 2016 ते 13 जून 2017 या कालावधीत नाशिक ग्रामीणचे अधीक्षक, तर 16 डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 हे 11 महिने ते नाशिक शहराचे आयुक्त होते.त्यांनी सोलापूर, पिंपरी-चिंचवडसह इतर ठिकाणी सेवा बजावली असून, राष्ट्रपती पदकाने त्यांचा सन्मान झाला आहे. नियमित सेवानिवृत्तीला चार महिने शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या शिंदे यांच्याशी ‘मटा’ने संवाद साधला. त्यावेळी ‘शासकीय सेवा पूर्ण होत आहे’, असे सांगत त्यांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिला.डिसेंबर 2022 मध्ये तत्कालीन उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवडमध्ये शाईफेक झाल्यावर शिंदे यांची नाशिकमध्ये बदली झाली होती.









