रोडरोमिओंसाठी धोक्याची घंटा! – भडगावात ‘दामिनी पथक’ सज्ज, विद्यार्थीनींना दिलासा.

भडगाव : शाळा-कॉलेज परिसरात होणाऱ्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी भडगाव पोलिसांनी एक ठोस पाऊल उचलले आहे. ‘दामिनी पथक’ या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील शिक्षण संस्था व बसस्टँड परिसरात महिला सुरक्षेसाठी कडक नजर ठेवली जाणार आहे.

पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या पुढाकाराने हे पथक सक्रिय करण्यात आले. विशेष म्हणजे, हे पथक केवळ गस्तच नाही तर संवादाच्या माध्यमातून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत आहे.दामिनी पथकात महिला उपनिरीक्षक लक्ष्मी कंरकार यांच्यासह शमीना पठाण, पंचशीला निकम, सोनी सपकाळे, योगिता मोरे, नर्गीस पठाण, वैशाली मराठे, प्रविण परदेशी आणि गौरव चौधरी हे पथकात सहभागी आहेत. या पथकाने सौ.सुमनताई गिरधर पाटील विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, आदर्श कन्या विद्यालय, लाडकुबाई विद्या मंदिर व बसस्थानक परिसरात विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. संवाद दरम्यान ‘गुड टच – बॅड टच’, सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक यावर जनजागृती करत आणि महिला हेल्पलाइन ११२ क्रमांकाची माहिती देण्यात आली.  पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सांगितले की, “कोणीही संशयित व्यक्ती किंवा रोडरोमिओ आढळल्यास दामिनी पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून कायदेशीर कारवाईस मागे-पुढे पाहणार नाही.” हा उपक्रम केवळ कार्यवाही पुरता मर्यादित नसून, एक सामाजिक भान निर्माण करणारा संवादात्मक प्रयत्न आहे. विद्यार्थिनीं व पालकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत, पोलिसांकडून मिळणाऱ्या या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. ‘दामिनी’ आता केवळ पडद्यावर नाही तर ती आता भडगावच्या रस्त्यांवर विद्यार्थिनींसोबत उभी आहे!

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.