कात्रज मंडई चौकात ड्युटी बजावतानाच चक्कर येऊन कोसळले, पुण्यात 42 वर्षीय वाहतूक पोलिसाचा चटका लावणारा अंत.

 बुधवारी सायंकाळी ड्युटीवर असताना साधारण पावणे सात वाजताच्या सुमारास पोलीस नाईक धनाजी वणवे यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते खाली कोसळले.पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक धनाजी भरत वणवे यांचे बुधवारी सायंकाळी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते पुण्यातील प्रसिद्ध कात्रज मंडई चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने पुणे वाहतूक विभागावर शोककळा पसरली असून, सहकाऱ्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय झालं? बुधवारी सायंकाळी ड्युटीवर असताना साधारण पावणे सात वाजताच्या सुमारास पोलीस नाईक धनाजी वणवे यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते खाली कोसळले. आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या साईस्नेह रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले होते. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.धनाजी वणवे हे गेली अनेक वर्षे पुणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. ते पोलीस नाईक म्हणून कर्तव्य बजावत होते. आपली ड्युटी नेहमीच अत्यंत जबाबदारीने पार पाडणारे, शिस्तप्रिय आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी ते कर्तव्यदक्षतेने नेहमी कार्यरत असायचे. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण वाहतूक पोलीस विभाग सुन्न झाला आहे.धनाजी वणवे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, पोलीस दलाने त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अनेक सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी वणवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कर्तव्यावर असताना प्राण गमावणारे वणवे हे समर्पित पोलिस सेवक होते. त्यांच्या सेवेचा आदर ठेवत त्यांना पुणे पोलीस दलातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.