भूस्खलनात अडकली, प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ, पण हार न मानता तिने हाताने माती खोदली, पाच तासांचा संघर्ष अन्…

हिमाचल प्रदेशात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातही मंडी येथे पूर आला आहे. रस्ते-पूल वाहून गेले आहेत. तर, अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.हिमाचलमध्ये सध्या पावसाने दाणादाण उडवली आहे. येथे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पूल, रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं. त्यातच हिमाचलच्या मंडी येथे एक चमत्कार घडला आहे. 20 वर्षांची एक मुलगी भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. तिला वाचवण्यासाठी पाच तास संघर्ष करावा लागला. पण, सुदैवाने ही मुलगी बचावली आहे.हिमाचल प्रदेशातील या मुलीचे नाव ट्यूनेजा ठाकूर आहे. ती ढिगाऱ्याखाली दबली होती. माती, दगड आणि ढिगाऱ्यामुळे तिच्यावर दबाव वाढत होता. पण, ट्यूनेजा ठाकूरने हार मानली नाही.

ती हातांनी माती खोदत राहिली. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. ट्यूनेजाला माहित होते की जर तिने हार मानली तर ती जिवंत वाचू शकणार नाही. तिला श्वास घेता येईल इतकी पुरेशी माती तिने बाजूला केली.तर, तिचे कुटुंबीय आणि गावकरी पाच तास तिचा शोध घेत होते. तर, दुसरीकडे ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या ट्यूनेजाला असं वाटत होतं की ती कधी बाहेर पडेल, एक-एक क्षण अधिक जड होत चालला होता. याबाबत ती सांगताना म्हणाली की, ‘मला फक्त एकच गोष्ट माहित होती – मला जिवंत बाहेर यायचं आहे.’ अखेर ट्यूनेजा ठाकूरला तिच्या पालकांनी बाहेर काढलं.ट्यूनेजा ठाकूर या घटनेचा अनुभव सांगताना म्हणाली की, ‘सर्वजण इकडे तिकडे पळत होते.

खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि घरांमध्ये पाणी शिरत होते. घाबरलेले लोकांच्या किंचाळ्या कानी पडत होत्या. मी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात बाहेर पडली. त्यानंतर अचानक भूस्खलन झाले आणि मी त्याखाली गाडले गेले.’हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात ट्यूनेजा ठाकूरची भेट घेतली. त्यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केले.मंडीमध्ये आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण, ट्यूनेजा ठाकूरची जगण्याची जिद्द ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 30 जून आणि 1 जुलै रोजी ढगफुटीमुळे या गावात मोठा विनाश झाला. 30 जून रोजी रात्री 11.30 वाजता पूर आला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.