“हिरवा निसर्ग हा भवतीने…”अन् धडाम्sss, माथेरानच्या घाटात भीषण अपघात, काळ आलेला पण वेळ आली नव्हती, काय घडलं?

माथेरान एक असं पर्यटनस्थळ आहे जीथे पावसाळ्यात पर्यटक हमखास भेट देतात. पण निसर्गाचा आस्वाद घेताना सावधगिरी बाळगणं सर्वात महत्त्वाचं. कारण जीव वाचला तरच तर जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. माथेरानला आलेल्या एका हैदराबादी कुटुंबासोबत एक भयानक घटना घडली.महाराष्ट्राचं निसर्गसौंदर्य परराज्यातल्याच काय, पण परदेशातल्या पर्यटकांनाही आकर्षित करतं. त्यात मान्सून म्हटलं तर आहाssहाss बातच न्यारी. माथेरान एक असं पर्यटनस्थळ आहे जीथे पावसाळ्यात पर्यटक हमखास भेट देतात. पण निसर्गाचा आस्वाद घेताना सावधगिरी बाळगणं सर्वात महत्त्वाचं. कारण जीव वाचला तरच तर जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. माथेरानला आलेल्या एका हैदराबादी कुटुंबासोबत एक भयानक घटना घडली. ‘अंगावर आले ते बोटांवर निभावले’ अशीच अवस्था या कुटुंबाची झाली.

हैदराबादहूनमाथेरानला आलेल्या पर्यटकांच्या कारला अपघात झाला. या अपघातात 6 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले. 8 जुलै रोजी जुमापट्टी रेल्वे क्रॉसिंगजवळ कारचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. कार रेलिंगला धडकून खाली कोसळली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने प्रवाशांचे प्राणवाचले.हैदराबादमधील गुंटूर जिल्ह्यातील साकेत राम, रेयूत त्रिलोक, काशू तेजस्विनी, रेहुक पूजिता, रेव्ह वैष्णवी आणि तेजस्वी इम्कोरल हे 4 जुलैला माथेरानला निघाले होते. 7 जुलैला ते माथेरानला पोहोचले. माथेरानच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतल्यानंतर 8 जुलै रोजी परत जात असताना दुपारी 12 वाजता हा अपघात झाला. त्रिलोक गाडी चालवत होता.

अचानक जुमापट्टी रेल्वे स्थानकाजवळ तीव्र उतारावर कारचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट रेलिंगला धडकली. कारचा वेग जरा जास्त असल्याने गाडी हवेत उडून सिमेंटच्या कठड्याला आदळली. कार एवढ्या जोरात धडकली की कठड्याचे दोन तुकडे झाले.अपघातानंतर घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या टीमने प्रवाशांना गाडीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रायगड हॉस्पिटलमध्ये पाठवले. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती”, त्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. एअर बॅगमुळे पुढील सीटवरील प्रवासी थोडक्यात बचावले. जखमींमध्ये दोन मुले आणि तीन मुली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.