शरद पवारांनी आझाद मैदान गाजवत शिक्षकांची मनं जिंकली, सरकारबद्दल काय म्हणाले…

मुंबईतील आझाद मैदानात सहा हजार अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी अनुदानासाठी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान न सोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शरद पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन सरकारशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.राज्यातील सुमारे सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप निधीची तरतूद न केल्याने हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवून घेऊ, अशा शब्दांत शिक्षकांना आश्वस्त केलं आहे.आंदोलन करणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून न्याय मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्रातील प्रशासनातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मान देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनानी घेतली पाहिजे.

काल मला रोहित पवारांकडून समजलं की इथं एक राज्यातील मंत्री येत आहेत. मला वाटलं की हे मंत्री येत आहेत तर चर्चा करून प्रश्न सोडवतील. पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. राज्य सरकारला स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांनी उद्याची पिढी घडवण्याची नैतिक जबाबदारी अंतकरणापासून स्वीकारली आहे, त्यांच्यावर संघर्षाची वेळ येता कामा नये. शिक्षकांची जी मागणी आहे त्यासाठी लवकरात लवकर पैशाची तरतूद करा. तुमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमच्या सगळ्यांकडून आग्रही भूमिका घेतली जाईल,” अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.”अपेक्षा आहे की आज-उद्या तुमच्या मागण्या मान्य होऊन तशी तरतूद सरकारकडून केली जाईल. आज-उद्या मी एवढ्यासाठी म्हटलं की आज बैठक आहे. आज निर्णय झाल्यानंतर जीआर काढायला अर्थखात्याकडे जावं लागतं, सामान्य प्रशासन खात्याकडे जावं लागतं. तुम्ही काही चिंता करू नका, प्रशासनातील मला थोडंफार समजतं. महाराष्ट्राची विधानसभा, विधानपरिषद आणि देशाची लोकसभा, राज्यसभा यात मी गेली 56 वर्षे सतत कार्यरत आहे. त्यामुळे प्रशासनाबाबत तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते, हे मला कोणी सांगायची गरज नाही.

त्यामुळे ती चिंता करू नका,” असं शिक्षकांना संबोधित करताना शरद पवार यांनी म्हटलं आहे.अंशत: अनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी शिक्षक आझाद मैदानात उतरले आहेत. राज्यातील सुमारे सहा हजार शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचे सरकारने मान्य केले होते. परंतु, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षक मंगळवारी आझाद मैदानात जमा झाले. त्यांनी मंगळवार आणि बुधवार शाळा बंद ठेवून आंदोलनाचा पवित्रा घेतला. जोपर्यंत अनुदान मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असे शिक्षकांनी ठरवले आहे.या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. भाजप आमदार गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेतली. “बुधवारी सकाळीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे” आश्वासन त्यांनी दिले. राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधी शासन निर्णयही काढण्यात आला. मात्र, त्यानंतरही सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांच्यासह शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. इतर वेळी संध्याकाळी आझाद मैदानावरील आंदोलकांना मैदान रिकामे करावे लागते. परंतु, शिक्षक आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने पोलिसही हतबल झाले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.