शाळेत जाताना अडवलं, खोलीत अत्याचार, वडील पोलिसात गेले, पण मुलीने घरात जीवन संपवलं, सांगली हादरली.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे एका दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. एका संशयित आरोपीला गावकऱ्यांनी मारहाण केली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे, तर दोघे फरार आहेत. अधिक तपास सुरू आहे.सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवल,तर या घटने प्रकरणी संतप्त ग्रामस्थांकडून एका संशयित आरोपीला बेदम मारहाण देखील करण्यात आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तसेच या घटनेचा निषेध म्हणून करगणी गाव बंद ठेवण्यात आलं होतं.दरम्यान या घटने प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहेत. तर दोघे जण पसार आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं आटपाडी पोलिसांच्या कडून सांगण्यात आले आहे. त्यातील एकाला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिल्याने त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत तर दोघे पसार आहेत.सदर घटनेतील पीडित मुलगी एका गावात कुटुंबासोबत शेतात राहत होती. ती गावातच माध्यमिक शाळेत दहावी मध्ये शिकत होती. तिने घरात सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या आगोदर रात्री मुलीने वडीलांना मुलांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. दुसऱ्या दिवशी ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार होते.

मात्र त्या अगोदरच तिने घरात गळफास घेतला.गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता आणि जाता हे तरुण तिचा पाठलाग करत होते. शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. तसेच घरी मोबाईलवरून फोन करून त्रास दिला जात होता. त्यामुळे मुलगी अस्वस्थ होती. यातील राजू विठ्ठल गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता. ती तीने धुडकावली होती. त्यानंतर तिच्यावर अधिक दबाव वाढवला. राजू गेंडा याने जबरदस्तीने तिला एका गावातील खोलीवर नेहून अत्याचार केला होता. याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात सर्व रा. करगणी आणि अनिल नाना काळे रा. बनपुरी यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.