तीन कोटी खर्च, सिक्रेट रुम, उंच भिंतींवर शॉक लागणारं कुंपण; छांगुरबाबाच्या कोठडीत काय काय?

प्रत्येक जातीच्या मुलींसाठी त्याने वेगवेगळे दर निश्चित केले होते. ब्राह्मण/क्षत्रिय/सरदार मुलींसाठी 15-16 लाख रुपये, तर मागासलेल्या जातीतील मुलींसाठी 10-12 लाख रुपयेउत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीनच्या आलिशान कोठडीवर प्रशासनाने बुलडोझर चालवला. कारवाईपूर्वी एका मीडिया पोर्टलने कोठडीत जाऊन पाहणी केली, त्यामुळे छांगुर बाबा जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचा संशय बळावला आहे. जमालुद्दीन हा बलरामपूरच्या उतरौला येथे बेकायदेशीर कृत्य करत होता. त्याला धर्मांतराच्या नेटवर्कमध्ये अनेक देशांतून 100 कोटींहून अधिक निधी मिळाला होता, अशी माहिती समोर आली आहे.आज तकच्या वृत्तानुसार, छांगुर बाबाच्या आलिशान कोठीवर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

छांगुर बाबा विदेशी वस्तूंचा शौकीन होता, त्याच्या आलिशान घरात कलावा हा पवित्र मानला जाणारा धागा आणि धार्मिक पुस्तके मिळाली. तो तरुणींना फसवून त्यांचे धर्मांतर करत असल्याचा संशय आहे. तो ज्या कोठीत राहत होता, तिथे उंचच्या उंच भिंती होत्या. त्या भिंतींवरून विजेचे प्रवाह असणारे काटेरी कुंपण लावलेले होते. यामुळे कोणालाही आतमध्ये प्रवेश करणे शक्य नव्हते. तेथे असलेल्या प्रत्येक खोलीला एक किचन जोडलेले होते. जमालुद्दीन धर्मांतरणाचे रॅकेट चालवत होता का, याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत.प्रत्येक जातीच्या मुलींसाठी त्याने वेगवेगळे दर निश्चित केले होते. ब्राह्मण/क्षत्रिय/सरदार मुलींसाठी 15-16 लाख रुपये, तर मागासलेल्या जातीतील मुलींसाठी 10-12 लाख रुपये आणि इतर जातीतील मुलींसाठी 8 ते 10 लाख रुपये दर ठेवण्यात आले होते. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे, ज्यात अनेक खुलासे होत आहेत.

छांगुर बाबा काही दिवस कोठीत राहून नंतर तेथून पळून जात असे. त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली होती. इतकी सुरक्षा का पुरवण्यात आली होती, याचा तपास सुरु आहे.बलरामपूरमधील उत्तरौला पोलीस ठाण्यातील मधपूर गावातील छांगूर बाबा, नसरीन आणि मेहबूब यांच्यासह अनेक संशयितांविरुद्ध तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी फक्त एका वर्षात परदेशी निधीतून बंगले, आलिशान कार आणि शोरूम खरेदी केल्याचा आरोप आहे. छागूर बाबाने मुंबईचे रहिवासी नवीन घनश्याम रोहरा, त्यांची पत्नी नीतू आणि मुलगी समाला यांचे ब्रेनवॉश करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले गेले. धर्मांतर केल्यानंतर, तिघांनी जमालुद्दीन, नसरीन आणि सबिहा अशी नावे ठेवली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.