विदर्भात पूरस्थिती, मध्यप्रदेशशी संपर्क तुटला, गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले.

गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाल नदीचा पूल पाण्याखाली आल्याने नागपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक थांबली. यासोबतच अंतर्गत रस्त्यांवरील नदी, नाल्यांचे पूल पाण्याखाली आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. धोका टाळण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली.विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बावनथडी नदीच्या पुरामुळे मंगळवारी महाराष्ट्राचा मध्य प्रदेशशी संपर्क तुटला.
मागील २४ तासांत भंडारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे वैनगंगा आणि बावनथडी नदीला पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे बावनथडी नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने महाराष्ट्र-मध्य प्रदेशचा संपर्क तुटला आहे. सकाळपासून पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यासोबतच वैनगंगा नदीच्या पुरामुळे १८ मार्गांवरील वाहतूक थांबली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीने २४५.५० मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली होती.

त्यामुळे लहान पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यासोबतच सर्व सातही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यातील सिहोरा मंडळात २३१.५० मिमी इतका झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने केशोरी, नवेगावबांध, देवरी, चिचगड, अर्जुनी-मोरगाव, आमगाव हद्दीतील अनेक रस्ते बंद पडले आहेत. जिल्ह्यात सरासरी ११०.६ मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवराचे दोन गेट तीन फूट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नदीकाठावरील गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. कवलेवाडा येथील पुष्पा पटले यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यात मागील २४ तासांत धुव्वाधार पाऊस झाला. मागील २४ तासांत ब्रह्मपुरी तालुक्यात १६२.८ मिमी तर नागभीड तालुक्यात १५२.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही अंतर्गत रस्ते बंद झाले असून दोन्ही तालुक्यातील सुमारे २० घरांचे अंशतः नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पहिलाच मुसळधार पाऊस असल्याने पूरस्थिती निर्माण झालेली नाही. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने नागभीड तालुक्यातील डोंगरगाव-नागभीड मार्ग बंद झाला आहे. या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.