अभिनेते माहिमकर यांच्यासाठी देवदूत ठरले एकनाथ शिंदे, बेघर होऊ न देण्याची दिली ग्वाही.

मराठी ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्याला मदत केली आहे.ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘लोकमत मराठी’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. सध्या त्यांना कोणीही सिनेमामध्ये काम देत नाहीये त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावली आहे. इतकंच नव्हे तर ते गिरगाव येथे पागडीवर राहत असताना त्यांच्या इमारतीच्या मालकाने इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इमारत रिडेव्हलप होणार हे समजताच मनमोहन माहिमकर यांच्या नातेवाईकांनी घरावर हक्क दाखवला. त्यामुळे त्यांना विकासाकडून मिळणारं भाडं बंद झालं. त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून माहिमकरांनी राज्यपालांकडे इच्छामरणासाठी अर्ज केला होता. अशातच आता मराठी अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा अध्यक्ष सुशांत शेलारने माहिमकरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माहिमकर म्हणाले होते की, ‘मला आता कामच मिळत नाहीये, मी खूप सिनेमे केले, मालिका केल्या पण आता मला अजिबात काम नाहीये. सरकार मला फक्त महिन्याला पाच हजार रुपये देतं. त्यातच माझं सगळं घर चालतं. मंत्रालयातून उडीसुद्धा मारायला लागेल, अशी माझ्यावर वेळ येईल. साईबाबांना मी साकडं घालतो, बाबा मला खाली उडी मारायची बुद्धी देऊ नका. मला खूप त्रास होतोय. मला मालिकांमध्ये काम मिळावं असं काहीतरी करा. काम मिळत नाहीये त्यामुळे मी पोरका आहे. मी एकटा राहतो. माझ्याकडे खाण्यासाठी पैसे उरलेच नाहीयेत, त्यामुळे ही माझी इतर काही खाण्याची इच्छा मारतो. कोण आता मला बघायला तयार नाहीये, वय झाल्यामुळे.’आर्थिक अडचणींना सामोरं जात असलेले मनमोहन माहिमकर यांच्या मदतीसाठी सुशांत शेलार धावून आला आहे.

त्याने माहिमकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घडवून दिली. एकनाथ शिंदे यांनी माहिमकरांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून गिरगावचं घर माहिमकर यांनाच मिळवून देण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यामुळे तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असंही सांगितलं.दरम्यान, एकनाथ शिंदे आणि मराठी अभिनेते तसेच चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मनमोहन माहिमकरांनी आभार मानले आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.