मुंबईतील कोळी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी ४०० कोटी रुपये खर्चून ३० वर्षांचा भाडेकरार करण्याची तयारी दर्शवली आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोळी समाज या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार तयार करू इच्छितो. तसेच, समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची त्यांची योजना आहे.मुंबईचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी आता मासेविक्रीच्या जागांसाठी आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. क्रॉफर्ड मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार वाचवण्यासाठी आणि मुंबईतील कोळी समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ४०० कोटी रुपये देऊन ३० वर्षांचा भाडेकरार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन देण्यात आले आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीतर्फे सांगण्यात आले.
‘महसूल वाढवण्याच्या दृष्टीने पलटण मार्गावरील सीटीएस १५०० हा भूखंड लिलावाद्वारे खासगी कंपनीला ३६९ कोटी रुपये रकमेत देण्यात आल्याचे समजल्यानंतर या भूखंडावर असलेल्या मासळी बाजाराबद्दल कोळी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाच दशकांपासून येथे मासळी बाजार आहे. या भागात सुमारे ३४८ परवानाधारक व्यापारी आहेत, अशी माहिती मच्छिमार भूषण गगराणी यांना निवेदन देण्यात आले आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीतर्फे सांगण्यात आले. ‘महसूल वाढवण्याच्या दृष्टीने पलटण मार्गावरील सीटीएस १५०० हा भूखंड लिलावाद्वारे खासगी कंपनीला ३६९ कोटी रुपये रकमेत देण्यात आल्याचे समजल्यानंतर या भूखंडावर असलेल्या मासळी बाजाराबद्दल कोळी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाच दशकांपासून येथे मासळी बाजार आहे. या भागात सुमारे ३४८ परवानाधारक व्यापारी आहेत, अशी माहिती मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.









