भरधाव स्कूल व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी, चालकाला कल्पनाही नाही, अंबरनाथमध्ये संताप.

व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसले असल्याने मागील बाजूला असलेली नर्सरीची दोन मुले अचानक व्हॅनबाहेर पडली. मागचा दरवाजा उघडला गेल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.अंबरनाथ येथील एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून नर्सरीचे दोन विद्यार्थी रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. या दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे, तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली. धक्कादायक म्हणजे स्कूल व्हॅन इतक्या वेगात होती, की मागचा दरवाजा उघडून दोन विद्यार्थी खाली पडले, याची जाणीवही चालकाला झाली नाही.अंबरनाथ पोलिसांनी व्हॅन चालक आणि दोन महिला केअरटेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपासात शाळा प्रशासनाची चूक आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

अंबरनाथ पोलिसांनी व्हॅन चालक आणि दोन महिला केअरटेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपासात शाळा प्रशासनाची चूक आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.अंबरनाथच्या पश्चिमेला अनेक नामवंत शाळा असून कल्याण-बदलापूर राज्य मार्गावर शेकडो स्कूल बसची वर्दळ असते. अनेक वाहनांतून धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूकही होते. सोमवारी सकाळी याच मार्गावरून एका शाळेची व्हॅन भरधाव वेगाने जात होती.व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसले असल्याने मागील बाजूला असलेली नर्सरीची दोन मुले अचानक व्हॅनबाहेर पडली. मागचा दरवाजा उघडला गेल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. यामध्ये एकाला जबर मार बसला तर दुसरा किरकोळ जखमी झाला. दोन्ही चिमुरड्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

चार वर्षांच्या ओजस शिनाळकर याच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत, तर दुसऱ्या विद्यार्थ्याला खरचटले आहे. सात आसनी स्कूल व्हॅनमधून बारा विद्यार्थी आणि दोन महिला केअरटेकर प्रवास करताना ही घटना घडली म्हणजे क्षमतेच्या दुप्पट विद्यार्थ्यांची यातून वाहतूक सुरु होती.मागचा दरवाजा उघडून दोन विद्यार्थी खाली पडल्याचं चालकाला समजलंही नाही. रिक्षा चालकाने स्थानिक नागरिकाच्या मदतीने दोघा विद्यार्थ्यांने उचललं, रिक्षाने व्हॅनचा पाठलाग करुन त्यांना थांबायला लावलं. त्यानंतर चिमुकल्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं.या प्रकरणी पोलिसांनी स्कूल व्हॅनचा चालक सोलमन सकप्पा आणि दोन केअरटेकर महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात शाळा प्रशासनाची हलगर्जी समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.