भटक्या कुत्र्याकडून पाठलाग; सहाव्या मजल्यावरुन पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटनेनं नागपुरात हळहळ.

रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जयेश त्याच्या मित्रांसह खेळून घरी जात होता. यावेळी रस्त्यावरील एक श्वान त्याच्यावर भुंकू लागला. जयेश पळाला. श्वान त्याच्या अंगावर धावला.भटका श्वान अंगावर धावून आला. त्याच्यापासून बचावासाठी बारावर्षीय मुलगा धावत धावत बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर गेला. श्वान तेथेही पोहोचला. घाबरलेल्या मुलाचा तोल जाऊन तो सहाव्या माळ्यावरून खाली पडला. यात त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवनगाव येथील देव हाइट्समध्ये घडली.जयेश रवींद्र बोकडे असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जयेश त्याच्या मित्रांसह खेळून घरी जात होता.

यावेळी रस्त्यावरील एक श्वान त्याच्यावर भुंकू लागला. जयेश पळाला. श्वान त्याच्या अंगावर धावला. त्यामुळे अधिक घाबरलेला जयेश जोराने पळू लागला. श्वानानेही त्याचा पाठलाग सुरू केला. अखेर जयेश धावत धावत सहाव्या माळ्यावरील कॉमन खिडकीजवळ लपू लागला. तरीसुद्धा श्वान त्याचा पाठलाग सोडत नव्हता. तोही सहाव्या माळ्यावर आला व जयेशच्या अंगावर धावून गेला. घाबरलेल्या जयेशचा तोल गेला व तो सहाव्या माळ्यावरील कॉमन खिडकीतून खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे बोकडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या परिसरातही शोककळा पसरली आहे.’हे पूर्णतः प्रशासनाचे अपयश आहे. आम्ही या याचिकेद्वारे भटक्या श्वानांचा उपद्रव अनेकदा मांडला आहे. मात्र, प्रशासन त्याबाबत गंभीर नाही.

मनुष्याचे जीव महत्त्वाचे की श्वानांचे, हे अजूनही प्रशासनाला कळत नसल्याचे यावरून दिसून येते. वास्तविक पाहता कोणताच भटका प्राणी रस्त्यांवर नको, असा कायदाच अस्तित्वात आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही, ही शोकांतिका आहे’, असे मत या जनहित याचिकेतील याचिकाकर्त्यांचे वकील फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले.प्रलंबित शहरातील भटक्या श्वानांच्या उपद्रवावर विजय तालेवार यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. यात न्यायालयाने मोकाट श्वानांच्या नसबंदीबाबत तसेच अन्य बाबींवर वेळोवेळी अनेक आदेश दिलेत. सध्या अशा श्वानांच्या शेल्टरसाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुमारे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.