रग्गड पगार तरी वरकमाईची हाव, मुख्याध्यापिकेला पैशांचा मोह आवरेना, अखेर फिर्यादीने ‘असा’ रचला डाव.

 कर्मचारी शासकीय असो वा नसो, पगाराव्यतिरिक्त वरची मलई खाण्याचा नाद लागला कि असे लाचखोर सावज हेरतात अन् एखाद्या अडलेल्या व्यक्तीला चांगलाच बळीचा बकरा बनवतात. पण आपल्या हक्कांची जाणीव असेल तर व्यक्ती अशा लाचखोरांपासून स्वतःला वाचवूही शकते आणि वरची मलई खाणाऱ्याला खडीही चारू शकते.जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये लाचखोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन आणि लिपिक आशिष पाटील यांना ACB (अँटी करप्शन ब्युरो) च्या पथकाने 36 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. एका शिक्षिकेच्या प्रसूती रजा मंजुरीसाठी त्यांनी ही लाच मागितली होती. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

पैशाचा मोह भल्या भल्यांची मती फिरवतो. लाच घेणे आणि देणे गुन्हा असला तरी एखाद्याच्या अडचणीचा फायदा घेऊन त्याच्याकडून पैसे उकळणं याबद्दल लाचखोर निर्ढावलेले दिसतात. आणि आपलं काम कोणत्याही अडथळ्याविना पार पडावं यासाठी हतबल व्यक्ती लाचखोरांच्या हिमतीला खतपाणी घालतात. कर्मचारी शासकीय असो वा नसो, पगाराव्यतिरिक्त वरची मलई खाण्याचा नाद लागला कि असे लाचखोर सावज हेरतात अन् एखाद्या अडलेल्या व्यक्तीला चांगलाच बळीचा बकरा बनवतात.पण आपल्या हक्कांची जाणीव असेल तर व्यक्ती अशा लाचखोरांपासून स्वतःला वाचवूही शकते आणि वरची मलई खाणाऱ्याला खडीही चारू शकते. ही घटना आपल्याला हेच दाखवते की फक्त शिक्षित असणे महत्त्वाचं नसतं तर आपल्या अधिकारांची जाण असणं आणि स्वतःसाठी उभं राहणंही महत्त्वाचं असतंतक्रारदार हे 61 वर्षांचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत.

त्यांची सून याच विद्यालयात शिक्षिका आहे. त्यांनी 2 जून रोजी सुनेच्या प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता. मुख्याध्यापिका महाजन यांनी रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना 5 हजार रुपये प्रमाणे 6 महिन्यांचे 30 हजार रुपये लाच मागितली. नंतर ही रक्कम वाढवून 36 हजार रुपये केली.तक्रारदाराने ACB कडे तक्रार दाखल केली. 7 जुलै रोजी ACB ने सापळा रचला. लिपिक पाटील लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. त्यानंतर मुख्याध्यापिका महाजन यांनाही अटक करण्यात आली. “प्रसूती रजा मंजुरीसाठी लाच” मागितल्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजी पसरली आहे.धुळे ACB चे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या घटनेमुळे खिरोदा गावाला, जी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते, तिला लाचखोरीचा डाग लागला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.