कोकणातील कोर्लेई समुद्रात रात्री दिसली एक संशयित बोट!मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कोर्लेई समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैल ( साधारण साडे पाच किलोमीटर अंतरावर) एक संशयीत बोट दिसली आहे. रेवदंडा नजीकच्या कोर्लेई समुद्रात ही बोट दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.कोकणात रायगड जिल्ह्यात रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत कोर्लेई येथे रात्री उशिरा खोल समुद्रात संशयीत बोट दिसल्याने खळबळ उडाली आहे.

मात्र ही बोट नेमकी कोणती आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे या बोटीबद्दल गूढ कायम आहे.दरम्यान या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी नौदल, एअर फोर्स यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्च ऑपरेशन सुरू केल आहे, दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे रेवदंडा येथे दाखल झाले आहेत.दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवरती कोकण किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई आधी समुद्र किनारपट्टी वरती सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवरती कोकण किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई आधी समुद्र किनारपट्टी वरती सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.रेवदंडा समुद्रात एक संशयास्पद बोट आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या घटनेमुळे परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.या संशयित बोटीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत.स्थानिक नागरिक आणि मच्छीमार यांच्यामध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास पोलिसांना त्वरित कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.पाकिस्तानी अतिरेकी कसाब आणि त्याचे साथीदार हे कराची येथून मुंबईत समुद्रमार्गे दाखल होत त्यांनी मुंबई वर २६नोव्हेंबर रोजी हल्ला केला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.