पळून गेलेल्या मुलाला शोधायला आला पण. वृद्ध बापाने मुलाचा काटा का काढला ?

पळून गेलेल्या मुलाला शोधायला आला पण. वृद्ध बापाने मुलाचा काटा का काढला ?

मुंबईतील गुन्ह्यांच्या घटनेने सामान्य नागरिक भयभीत झाले असून जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. त्यातच आता दादरसारख्या मध्यवर्ती भागात एका वद्धाने तरूणाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.यामुळे पर्चंड खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याने हत्या केली तो त्या तरूणाचा पिताच होता, असेही समोर आले आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी 80 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीनेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. आरोपीनेच पोलिस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा कबूल केल्याने पोलिसही चक्रावले. मात्र अखेर त्यांनी त्याल अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, अन्वर काळे असे मृत तरूणाचे नाव असून तो 35 वर्षांचा होता. तर युवराज काळे (वय 80) असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. युवराज काळे हे छत्रपती संभाजी नगर येथील लासूर रेल्वे स्थानकासमोर आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांचा मुलगा अन्वर हा वारंवार मुंबईला पळून जायचा. गेल्या आठवड्यात देखील तो मुंबईला पळून आला होता. त्याचा शोध घेण्यासाठी युवराज काळे हे मुंबईत आले होते.

रविवारी त्या दोघांची भेट झाली. त्यानंतर दुपारी 2.30 च्या सुमारास पोर्तुगीज चर्च जवळील सॅल्वेशन शाळेजवळील पदपथावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि रागाच्या भरात युवराज यांनी त्यांच्यासोबत आणलेला टाकून त्यांच्या मुलाच्या, अन्वरच्या पोटात डाव्या बाजूला खुपसला. गंभीर जखमी झालेला अन्वर तेथेच खाली कोसळला. मात्र त्याला तसंच जखमी अवस्थेत टाकून त्याचे वडील, युवराज हे तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनध्ये जाऊन स्वत:च्या गुन्हयाची कबुली दिली. या घटनेबद्दल समजताच दादर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी अन्वरला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. रुग्णालयात अन्वरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.