हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू; रामलिंग रोड येथील घटना

हाय व्होल्टेजच्या तारांखाली सेंट्रींगचे काम करताना तारेचा शॉक बसून कामगाराचा मृत्यू; रामलिंग रोड येथील घटना

निमगाव भोगी : रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. 25 ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम सुरु होते. त्यादरम्यान कोणतीही काळजी न घेता तसेच महावितरणाची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय 46) असे मृत कामगाराचे नाव आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.30 सप्टेंबर) राधेश्याम चौरासिया हे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रामलिंग रोडवरील साईटवर सेंट्रींगच्या कामावर गेले होते. दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सुधीर चौरासिया (वय 24) हा शिरुर येथे जेनेरिक मेडीकल येथे असताना त्याला ओळखीचे अनिल घावटे यांचा फोन आला व त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुझे वडील राधेश्याम चौरासिया (वय 46) यांना बांधकामाच्या साईटवर असताना इलेक्ट्रिक लाईटचा शॉक लागला आहे.

तेव्हा लगेच रामलिंग येथे वडीलांचे काम चालु असलेल्या ठिकाणी मुलगा सुधीर हा गेला असता. त्याला त्याचे वडील तेथे बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांच्या मदतीने मुलाने वडिलांना उपचारकामी शिरुर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी राधेश्याम चौरसिया यांना तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत सुधीर चौरसिया यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिरी हे करत आहे.

बांधकाम व्यावसायिकाचा आतातायीपणा नडला….?

सदर डेव्हलपर्सने पोल व तारा शिफ्टिंग साठी महावितरणकडे अर्ज केला होता. परंतु त्याबाबतचे काम प्रलंबित होते. त्यामुळे परवानगी न घेता पोल व तारा शिष्ट न करता डेव्हलपर्सने काम सुरु केल्याचे शिरुर महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी सांगितले आहे. हाय होल्टेजच्या ताराखाली असे धोकादायकरीत्या काम केल्यामुळे हा अनर्थ घडला आहे. त्यामुळे आता महावितरण विभाग आणि शिरुर पोलीस स्टेशन यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.