बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट.दोन प्रवाशांचे १ लाख ३० हजाराचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट.दोन प्रवाशांचे १ लाख ३० हजाराचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

नाशिक- शहरातील बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून गर्दीची संधी साधत भामटे प्रवास्यांचे अलंकार हातोहात लांबवित आहेत. शनिवारी (दि.२८) ठक्कर बाजार बसस्थानकात वेगवेगळया ठिकाणच्या बसमध्ये चढतांना मोखाडा ता.पालघर येथील महिलेच्या दागिण्यांसह कुटूंबियास बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची सोनसाखळी भामट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोखाडा ता.पालघर येथील रूपाली सचिन वैद्य या पुणे येथे गेल्या होत्या. शनिवारी (दि.२८) दुपारी त्या नाशिकला परतल्या असता ही घटना घडली. मोखाडा येथे जाण्यासाठी त्या सायंकाळच्या सुमारास ठक्कर बाजर बसस्थानकात गेल्या होत्या. बसमध्ये चढत असतांना गर्दीत त्यांच्या गळयातील सोन्याचा गोफ व मंगळसुत्र असा सुमारे १ लाख ७ हजार ८१८ रूपये किमतीचे अलंकार भामट्यानी हातोहात लांबविले.

दुसरी घटना याच बसस्थानकात दुपारच्या सुमारास घडली. पंकज अभिमन्यु बागुल (रा.श्रीरामनगर,कोणार्क नगर) यांनी फिर्याद दिली आहे. बागुल शनिवारी (दि.२८) कुटूंबियांना सोडण्याताठी ठक्कर बाजार बसस्थानकात आले होते. ताहराबाद येथे जाण्यासाठी ते एमएच २० बीएल १३९१ या नवापूर साक्री बसमध्ये कुटूंबियांसाठी जागा सांभाळण्यासाठी चढले असता ही घटना घडली. बसला गर्दी असल्याने ते जागा सांभाळण्यासाठी बसमध्ये चढले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे २२ हजार ५०० रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार साबळे व गांगोडे करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.