धक्कादायक ! सासऱ्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध, कित्येक वर्ष सासू शांत होती अन् एका दिवशी घडलं असं काही..

धक्कादायक ! सासऱ्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध, कित्येक वर्ष सासू शांत होती अन् एका दिवशी घडलं असं काही..

मुंबई : एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सासऱ्याचे आपल्या सुनेसोबत अनैतिक संबंध होते. सासूने गोष्टीला खूप वर्षं विरोध केला; परंतु, एक वेळ अशी आली की तिला हे सगळं सहन करणं जीवाशी आलं आणि तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला. ही धक्कादायक घटना बिहार राज्यातल्या जमुईमध्ये घडली आहे. ही महिला सासरा-सुनेच्या अनैतिक संबंधांना विरोध करत असल्याची माहिती समोर आली आहे. संपतिया देवी असं मृत महिलेचं नाव असून या महिलेचा पती, मुलगा आणि सुनेने छळ केला. सासरा-सुनेच्या संबंधांना विरोध केल्याने हे तिघे तिला मारायचे, त्यामुळे ती मुलींकडे राहत होती. कधी तरी ती घरी यायची. या वेळी आल्यावर तिने या दोघांच्या संबंधांना विरोध केला, यानंतर तिला सर्वांनी मारहाण केली. या त्रासाला कंटाळून संपतिया देवीने आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर महिलेचा पती, मुलगा आणि सून हे सर्व फरार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, झाझा पोलीस स्टेशन हद्दीतल्या बलियोडीह या गावातील ही घटना आहे. मृत संपतिया देवीचा (55 वर्षं) पती बलदेव यादव याचे त्याच्या सुनेशी 10 वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत, असा आरोप आहे. पती आणि सून यांच्यातल्या अनैतिक संबंधांमुळे संपतिया देवी तणावात होती. ती त्याला हे सगळं थांबवायला सांगत होती;परंतु, तो उलट तिलाच मारहाण करत होता. इतकी वर्षं ती ही गोष्ट सहन करत होती; पण आता हे सारं असह्य झाल्याने तिने विषप्राशन करून आयुष्य संपवलं. मृत महिलेच्या मुलीने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. ललिताने आईच्या मृत्यूला वडील, भाऊ आणि वहिनीला जबाबदार धरलं आहे. या तिघांनी आईला विष देऊन मारलं असा तिचा आरोप आहे. ‘अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे ते आईला मारहाण करायचे. तिला जेवू घालत नव्हते. या वेळी मारहाण करून तिला विष पाजून मारहाण केली आणि सगळे पळून गेले’, असा आरोप ललिताने केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.