सोयरीक जुळवण्याचा मुहूर्त ठरला, आदल्या दिवशी 30 वर्षीय बँक मॅनेजरवर काळाचा घाला, हेल्मेट घातलेलं पण…

नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींना धडक बसलीसुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत बाहेर जेवण करण्यासाठी गेलेल्या बँक मॅनेजरवर नियतीने घाला घातला. एका विचित्र अपघातात अज्ञात वाहनाने चिरडले आणि 30 वर्षीय बँक मॅनेजर आशिष देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही मन हेलावून लावणारी घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे बँक मॅनेजरच्या सोयरीकीचा कार्यक्रम आज होणार होता. विवाहाची गाठ जुळण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्धापकाळात आई-वडिलांचा आधार हरपल्याने पंचक्रोशीत शोक व्यक्त केला जात आहे.

मयत आशिष देशमुख हे मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवाल येथील रहिवासी होते. दोन वर्षांपासून ते नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील निवघा बजार येथील आयडीबीआय बँकेत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.काही दिवसांपूर्वी त्यांची लोहा तालुक्यात बदली झाली होती. ड्युटीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी तयारी केली. दरम्यान शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने सहकारी मित्रांसोबत त्यांनी बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखला.नांदेड -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना पाऊस सुरु झाला. हदगांव येथील कवठा शिवारात येताच त्यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींना धडक बसली.

डोक्याला हेल्मेट असल्याने देशमुख यांना डोक्याला मार लागला नाही, पण पाठीमागून येणाऱ्या दोन वाहनांनी त्याला चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे आशिष देशमुख यांचा सोमवारी सोयरीकीचा कार्यक्रम होणार होता. दोन्ही कुटुंबीयांनी कार्यक्रमाची तयारी देखील केली होती. मयत आशिष देशमुख हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांना दोन बहिणी आहेत. त्यांची आई सुद्धा वृद्धापकाळामुळे आजारी आहे. संसाराचे सुख पाहण्यापूर्वीच आणि विवाह बंधनात अडकण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे देशमुख कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.