पांडुरंगानेच वाचवलं! पंढरपूरवरून येताना STचा भीषण अपघात पण घडला चमत्कार, 50 जणांचा वाचला जीव.

आषाढी एकादशीच्या वारीहून परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून उलटली, ज्यात १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पांडुरंगच्या कृपेने मोठा अनर्थ टळला, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.आषाढी एकादशी समारोप झाल्यानंतर विठुरायाच्या दर्शनानंतर वारकऱ्यांचं भाविकांचं परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे एसटी महामंडळाच्या खामगाव कडे येत असलेल्या पंढरपूर निघालेल्या बसला अपघात झाला. मात्र पांडुरंगाचीच कृपा आणि आम्ही बचावलो अशा प्रतिक्रिया अशा बोलक्या भावना वारकऱ्यांच्या आहे. मात्र या अपघातामुळे भाविकांनी आपला जीव मुठीत ठेवला होता. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाने प्रसन्न झालेल्या मनांना परतीच्या प्रवासात एकाएकी मोठा हादरा बसला.

आषाढी वारीहून भाविकांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसला आज सोमवार ७ जुलै पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराजवळ अपघात झाला.चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकाला धडकून उलटली, ज्यामुळे खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पांडुरंगाची कृपा आणि मोठा अनर्थ टळला. विठुरायाच्या दर्शनानंतर निघालेले हे सर्व भाविक आषाढीला पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या घराकडे निघाले होते. एक मोठा अनर्थ एसटी बसचा अपघाताचा टळल्याने आम्ही त्यांच्याच कृपेने बचावलो अशी त्यांची भावना दिसून आली.

खामगाव आगाराची एसटी बस क्र. MH ४० Y ५८३० पंढरपूरहून ५२ भाविकांना घेऊन परतीच्या मार्गावर होती. पहाटे सुमारे पावणेदोनच्या सुमारास, चिखली शहरातील महाबीज प्रक्रिया केंद्रासमोर चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे वेगात असलेली बस थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. रात्रीची वेळ असल्याने आणि बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने बसमध्ये मोठा गोंधळ उडाला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने चिखली आणि बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या १५ प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती समोर आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.