बैल विकले पण पैसे दिले नाहीत, निर्दयी मुलाची वडिलांना बेदम माराहण; रागातून निर्घृण हत्या.

बार्शी तालुक्यातील गावात धक्कादायक घटना घडली. पैशाच्या वादातून मुलाने वडिलांची हत्या केली. आरोपी मुलाने वडिलांना काठी आणि चाबकाने मारले. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावात पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलानेच वडिलांची निघृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रावण सोपान खुरंगुळे (वय ७०) असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. मुलगा अनंतराव ऊर्फ अनिल रावण खुरंगुळे याने काठी आणि पोतराजाच्या चाबकाने मारहाण करुन वडिलांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीदरम्यान झालेल्या जखमांमधून घरात रक्ताचा पाट वाहिला. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांनी बैल विकले, पण त्यातून आलेले पैसे दिले नसल्याचा राग मनात धरुन मुलाने बापाची निघृण हत्या केली.

याप्रकरणी संशयित मुलगा आरोपी अनिल खुरंगुळे याला बार्शी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.पिता रावण खुरंगुळे हे घरी झोपले होते. यादरम्यान संशयित आरोपी मुलगा अनंतराव ऊर्फ अनिल रावण खुरंगुळे हा तिथे आला. त्याने वडिलांना झोपेतून उठवत बैल विकल्याचे पैसे न दिल्यासंबंधी विचारणा करायला सुरुवात केली. पुढच्या काही वेळातच पैशाच्या कारणावरुन काठी आणि पोतराजाचा चाबूक याने संशयित अनंतराव ऊर्फ अनिल याने वडील रावण खुरंगुळे यांना जबरी फटके मारले. त्यातच ते बेशुध्दावस्थेत गेले आणि वृद्ध रावण खुरंगुळे त्यांचा मृत्यू झाला.वाणेवाडी गावचे पोलीस पाटील लोखंडे (वय ३३, रा. वाणेवाडी) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,

दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.१५ वाजता गावातील नागरिकांकडून माहिती मिळाली की, रावण खुरंगुळे हे घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत.घराचा एक दरवाजा बंद तर दुसरा उपडा होता. घराच्या खोलीत रक्त पडलं होतं. दरम्यान, घरात झोपलेल्या अनंतरावला नागरिकांनी जाग केल्यानंतर तो म्हणाला मरु दे, काल त्याने बैल विकले, पण पैसे दिले नाहीत, म्हणून मीच त्याला काठीने आणि पोतराजाच्या चाबकाने मारलं. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रावण खुरंगुळे यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी मुलाला ताब्यात घेतलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.