जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहन.

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनजळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस स्टेशन आता सुमारे ४ कोटी रुपये खर्चून अवघ्या १५ महिन्यांत बांधलेल्या स्वतंत्र व ‘कॉर्पोरेट लूक’ असलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे.कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी भौतिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीट हवालदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व वेगवान होणार आहे.”यानंतर जिल्हा पोलीस दलासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या १६ जीप आणि अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनांचा लोकार्पण समारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. २ कोटी १२ लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचा वापर आजपासून सुरू झाला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.