पुण्यात पुन्हा सैराट! दोन महिन्यांआधी आळंदीत प्रेमविवाह, मावसभावाच्या डोक्यात प्रचंड राग, दाजीला…

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. टाकळी हाजी येथे कुडंई मेन्स पार्लरमध्ये ही घटना घडली, ज्यात दुकान मालक गंभीर जखमी झाला. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… या कवितेच्या ओळी देणाऱ्या कुसुमाग्रजांचा हा महाराष्ट्र. पण पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटना या वारंवार होत असतात. अशा अनेक घटनांनी राज्य वारंवार हादरलं आहे. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडली आहे.पण्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडली आहे. या हल्ल्यात दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२,रा.तामकरवाडी-टाकळी हाजी, ता.शिरूर,जि.पुणे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. टाकळी हाजी येथील कुडांई मेन्स पार्लरमध्ये या भयानक हल्ल्याच थरार नाट्य घडले असून, दुकानाची तोडफोड करून दुकान मालकाच्या हातावर आणि पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले आहेत.

तर हल्ला करून पळून जाणाऱ्या दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय वाघ हा आपली पत्नी स्नेहा हिच्यासह टाकळीहाजी येथे वास्तव्यास आहे. त्याचे याच परिसरात कुडांई मेन्स पार्लर हे सलून दुकान आहे. दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता. मात्र, स्नेहाचे नातेवाईकांना हा प्रेम विवाह मान्य नव्हता. त्यामुळे दत्तात्रय याला वारंवार स्नेहाचा मावसभाऊ रवींद्र गायकवाड आणि इतर नात्यातील व्यक्तींनी जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. या संदर्भात दत्तात्रय याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती.आत दत्तात्रय वाघ हा त्याच्या सलूनमध्ये शटर बंद करून, आशुतोष भाकरे याचे केस कापत असताना, अचानक दुकानाचे शटर उघडून जीवन रविंद्र गायकवाड, शारुख बाबू शेख (वय २६), प्रशांत हनुमंत साठे (वय १९) हे तिघे दुकानामध्ये घुसले. त्यांनी दत्तात्रय याच्या दुकानाच्या काचा फोडल्या. त्याचप्रमाणे दुकानातील साहित्याची नासधूस केली.

जीवन गायकवाडने लोखंडी कोयत्याने दत्तात्रय वाघ याच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार करून, तिघा आरोपींनी दत्तात्रयला जीवे मारण्याची धमकी देऊन तीनही आरोपी मोटारसायकल वरून रांजणगावच्या दिशेने निघाले.हे आरोपी पळून जात असताना गावकऱ्यांनी पाठलाग करून दोघा अनोळखी आरोपींना पकडून टाकळी हाजी पोलीस चौकीमध्ये आणले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांची नावे शारुख शेख आणि प्रशांत साठे अशी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच जीवन गायकवाडच्या मदतीने दत्तात्रय वाघ याच्यावर हल्ला केल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दत्तात्रय वाघ याला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्या तक्रारीवरून तिघा आरोपींविरोधात गंभीर दुखापत, तोडफोड व जीव घेण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी दत्तात्रय हौशीराम वाघ त्याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जीवन रविंद्र गायकवाड (रा.कानगाव, ता.दौंड,जि.पुणे याच्यासह शारुख बाबू शेख (वय २६ वर्ष) आणि प्रशांत हनुमंत साठे (वय १९ वर्ष,दोघेही रा. पाटस, ता.दौंड, जि.पुणे) या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.