भारताचा महाविजय… एजबॅस्टन विजयावर आली विराट रिॲक्शन, गिलसोडून दोन खास व्यक्तींचा उल्लेख.

बर्मिंगहॅममध्ये भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला. एजबॅस्टनच्या मैदानावर इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे लक्ष्य होते, पण बेन स्टोक्सची टीम दुसऱ्या सत्रातच 271 धावांवर ऑल आऊट झाली आणि भारताने 336 धावांनी मोठा विजय मिळवला. बर्मिंगहॅममध्ये भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला. एजबॅस्टनच्या मैदानावर इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे लक्ष्य होते, पण बेन स्टोक्सची टीम दुसऱ्या सत्रातच 271 धावांवर ऑल आऊट झाली आणि भारताने 336 धावांनी मोठा विजय मिळवला. आकाश दीपने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या आणि सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या. धावांच्या आधारावर इंग्लंडविरुद्धचा हा भारताचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या विजयामुळे दोन्ही टीम्स मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहेत. या विजयानंतर विराट कोहलीने भारतासाठी खास पोस्ट शेअर केली.

भारतीय टीमच्या या विजयानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी टीमला शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने सोशल मीडियावर टीमला शुभेच्छा देताना लिहिले, “एजबॅस्टनमध्ये भारताचा शानदार विजय. निडरतेने खेळलात आणि इंग्लंडला सतत अडचणीत आणलात. शुभमनने बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि सर्वांनी प्रभावी खेळ दाखवला. सिराज आणि आकाशने या पिचवर ज्या प्रकारे बॉलिंग केली, त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक .”भारताने एजबॅस्टन मैदानावर अद्याप एकही कसोटी सामना जिंकला नव्हता. भारताने येथे पहिला कसोटी सामना 1967 मध्ये खेळला. 2022 मध्ये इंग्लंडने चौथ्या डावात 378 धावांचा पाठलाग केला. पण यावेळी भारताने इंग्लंडला केवळ पराभूत केले नाही तर परदेशात धावांनी सर्वात मोठा विजयही मिळवला. भारतासाठी हा विजय खूप खास आहे.

टीम इंडियाने या मैदानावर सुमारे सहा दशकांत विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.बर्मिंगहॅम कसोटीत गिलने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. गिलने या सामन्यात 430 धावा केल्या. त्याच वेळी, आकाशदीपने या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 10 बळी घेतले. मोहम्मद सिराजनेही घातक गोलंदाजी केली आणि पहिल्या डावात 6 बळी आणि दुसऱ्या डावात एक बळी घेतला. भारताच्या तरुण संघाचे विराटव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सौरव गांगुली, व्हि व्हि लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, वसीम जाफर, दिनेश कार्तिक यांनीही भारताचे कौतुपक केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.