भारताच्या जुन्या मित्राला सापडलं ‘काळं सोनं’; पाश्चिमात्य देशांत भितीचं वातावरण, नवा वाद पेटणार.

भारताच्या जुन्या मित्राला अंटार्क्टिकामध्ये काळ सोन सापडलं आहे. या शोधामुळे अंटार्क्टिक कराराचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जगातील मोठ्या शक्तींमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.अंटार्क्टिका खंडातील बर्फाखाली रशियाला तेलाचा मोठा साठा सापडला आहे. रशियन वैज्ञानिकांच्या मते, वेडेल समुद्राखाली ५११ अब्ज बॅरल तेल दडलेले आहे. या ‘काळ्या सोन्याच्या खजिन्या’मुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अंटार्क्टिक कराराचे काय होणार? भविष्यात ऊर्जेसाठी स्पर्धा वाढणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. रशियाच्या या शोधामुळे भूराजकीय क्षेत्रात खळबळ माजेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगातील मोठ्या शक्तींमध्ये या तेलासाठी स्पर्धा होऊ शकते.न्यूजवीकच्या माहितीनुसार, अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली सुमारे ५११ अब्ज बॅरल तेल आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यापेक्षाही हा साठा मोठा आहे.

उत्तर समुद्रात गेल्या ५० वर्षांत जेवढे तेल उत्पादन झाले, त्याच्या दहापट जास्त तेल इथे आहे. सौदी अरेबियाच्या तेल साठ्यापेक्षाही हा साठा दुप्पट आहे. रशियन वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे.वेडेल समुद्रात तेलाचा मोठा साठा सापडला आहे. या भागावर यूके (UK) म्हणजेच ब्रिटन आपला हक्क सांगतो. अर्जेंटिना आणि चिली या देशांनी सुद्धा या भागावर दावा केला आहे. त्यामुळे या भागात आधीपासूनच राजकीय तणाव आहे. त्यातच आता रशियाने तेलाचा साठा शोधल्यामुळे हा तणाव आणखी वाढू शकतो.१९५९ मध्ये अंटार्क्टिक करार झाला होता. या करारात ठरले होते की, अंटार्क्टिका खंड शांततापूर्ण संशोधनासाठी वापरायचा आहे. तिथे लष्करी कारवाई करायची नाही आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करायचा नाही. अमेरिका आणि यूके सारख्या देशांनी अंटार्क्टिकाला आर्थिक लूटीपासून वाचवण्यासाठी हा करार केला होता. पण रशिया ने आता तेल शोधल्यामुळे अनेक तज्ज्ञ या कराराचे उल्लंघन होत आहे, असे म्हणत आहेत.

रशिया संशोधनाच्या नावाखाली या क्षेत्राचा वापर करत आहे, असा आरोप केला जात आहे.युक्रेन युद्धामुळे रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध आधीच बिघडले आहेत. त्यातच रशियाने अंटार्क्टिकामध्ये तेल शोधल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रशिया या भागाचा वापर करून आपली ताकद वाढवू शकतो, अशी भीती पाश्चिमात्य देशांना वाटत आहे. रशिया भविष्यात ऊर्जा पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू शकतो, अशी शंका त्यांना आहे.चीन ने सुद्धा या प्रकरणात उडी घेतली आहे. चीनने अंटार्क्टिकामध्ये पाचवे संशोधन केंद्र उघडले आहे. चीन आणि रशिया यांच्यातील वाढती मैत्री पश्चिम देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रशिया आणि चीन मिळून अंटार्क्टिकावरील निर्बंध हटवण्याचा प्रयत्न करू शकतात, असा अंदाज काही तज्ज्ञ लावत आहेत. अनेक दशकांपासून ज्या शक्तींनी अंटार्क्टिकाला सुरक्षित ठेवले आहे, त्यांना हे देश आव्हान देऊ शकतात.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.