एजबॅस्टनचा किल्ला जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता लॉर्ड्सवर अतिक्रमण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडची नाचक्की करण्यासाठी भारतीय संघात मॅचविनरची एन्ट्री होईल.एजबॅस्टनचा किल्ला जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता लॉर्ड्सवर अतिक्रमण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतासाठी जोरदार गोलंदाजी केली, परंतु त्याला एजबॅस्टनमध्ये विश्रांती देण्यात आली. एजबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला. भारताकडून शुभमन गिलच्या नेतृत्त्वात तरुण भारतीय संघाने अतिशय दमदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली. आता लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडची नाचक्की करण्यासाठी भारतीय संघात मॅचविनरची एन्ट्री होईल.
जसप्रीत बुमराह आता लॉर्ड्स कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने लॉर्ड्स कसोटीत खेळण्याबद्दल पुष्टी केली आहे. एजबॅस्टनमधील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर गिलला विचारण्यात आले की, “जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळेल का?” बुमराहबद्दलच्या या प्रश्नाचे उत्तर देताना शुभमन गिल म्हणाला, “निश्चितच पहिल्या सामन्यानंतर आम्ही ज्या गोष्टींवर चर्चा केली त्या अगदी बरोबर होत्या. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहून खूप आनंद झाला. जर आम्ही अशा खेळपट्टीवर 400-500 धावा केल्या तर आम्ही खेळात राहू. असे नाही की आम्ही नेहमीच इतके झेल सोडू.”कर्णधार शुभमन गिलनेही आकाशदीपच्या गोलंदाजीचे कौतुक केले.









