अंगापेक्षा बोंगा जड! चोरी तर केली, पण वजन तोलवेना; रस्त्यात तिजोरी फेकून चोराने ठोकली धूम.

बालेवाडीतील व्यावसायिक संकुलातील परदेशी चलन विनिमय कार्यालयात दोन जुलै रोजी ही चोरीची घटना घडली होती.एका चोरट्याने व्यावसायिक संकुलातील कार्यालयातून सुमारे २० लाख रुपयांचे परदेशी चलन असलेली तिजोरी चोरली. मात्र, दुचाकीवरून ती तिजोरी घेऊन जाणे अवघड झाल्याने तीनशे मीटर अंतरावरच ती फेकूनही दिल्याचे पोलिस तपसात समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून केलेल्या तपासात ही गोष्ट उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी तिजोरीचा शोध घेऊन, ती ताब्यात घेतली.बालेवाडीतील व्यावसायिक संकुलातील परदेशी चलन विनिमय कार्यालयात दोन जुलै रोजी ही चोरीची घटना घडली होती. फॉरेक्स व्यापारी रोहित मालुसरे (वय ४०, रा. सोमवार पेठ) यांनी बाणेर पोलिसांत तक्रार नोंदवली.

बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले, ‘आम्हाला बालेवाडीतील यशदा चौकात एका मोकळ्या जागेत सर्व परदेशी चलनाच्या नोटांसह तिजोरी सापडली. आम्ही तिजोरीतील सर्व परदेशी चलन जप्त केले.’ मालुसरे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात गेले, तेव्हा चोरीची घटना उघड झाली. त्यांनी तातडीने आमच्याशी संपर्क साधला. एका पथकाने मालुसरेंचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला.दुसऱ्या पथकाने मालुसरेंच्या कार्यालयातील, इमारतीतील आणि रस्त्यावरील व्यावसायिक आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले.

त्या फुटेजची बारकाईने तपासणी केल्यावर, एक चोर दुचाकीस्वार व्यावसायिक इमारतीत पोहोचल्याचे दिसले. मालुसरेंच्या कार्यालयात घुसून तो तिजोरीपर्यंत पोहोचला. त्याने ती अवजड तिजोरी मोठ्या कष्टाने त्याच्या दुचाकीपर्यंत नेली. मात्र, तिजोरीच्या मोठ्या आकारामुळे चोराला ती दुचाकीवरून घेऊन जाण्यात अडचणी आल्या; तरीही त्याच अवस्थेत तो दुचाकी सुरू करून निघाला. त्या वेळी तिथे सुरक्षारक्षक नव्हता, अशी माहिती सावंत यांनी दिली.चोरी झालेले परकीय चलन आम्ही पूर्णपणे हस्तगत केले आहे. आता आम्ही चोराचा शोध घेत आहोत. लवकरच आम्ही त्याच्यापर्यंत पोचू.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.